अणुहून लहान, आकाशाहून मोठा

Date: 
रवि, 26 एप्रिल 2015

नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे।
रघूनायेका ऊपमा ते न साहे।
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें।
तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे।।198।।

रामाचे मोठेपण आकाशाएवढे आहे, असे गेल्या श्र्लोकात म्हटले आह; तेव्हा एखाद्याला वाटले असेल की, ही अतिशयोक्ती झाली. पण त्याची ही शंका, हा श्र्लोक काढून टाकीत आहे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापली आहे. म्हणून रामाच्या मोठेपणाला आकाशाची उपमा देणे, हे पुरेसे वाटत नाही. याचे कारण सर्व विश्र्वात तो संकुलतेने एकरूप झालेला असल्यामुळे त्याला व्यापक म्हणण्याने तरी काय साधणार?

मोठे शून्य किंवा छोटे शून्य, यामुळे शून्याच्या मूल्यात काहीच फरक पडणार नाही. असंख्य गुणिले असंख्य म्हणजे असंख्यच असतात. राम हा शून्यरूप आहे आणि असंख्यरूप आहे. म्हटल्याने, मोठे आणि छोटेपण यामुळे, निराळा बोध होऊ शकत नाही असा या श्र्लोकाचा निष्कर्ष निघतो. ब्रह्म हे सूक्ष्म आहे आणि भव्य आहे. राम हे ब्रह्माचेच दुसरे नाव अशी श्रध्दा असल्यावर रामसुध्दा सूक्ष्मात सूक्ष्म आणि भव्यात भव्य आहे. पाण्याच्या एका थेंबात, प्रत्येक कणात हायड्रोजनचे दोन व ऑक्सिनचा एक घटक एकत्र आला आहे. जे सत्य एका थेंबापुरते खरे तेच सत्य समुद्रात खरे. त्यात छोट्या मोठेपणाच्या वर्णनाला वाव उरत नाही.

मनोबोधाचे ओवीरूप
सदा भांडण पुत्रांचे। कोणी नायकती कोणाचें।्र
वनिता अति प्रीतीचें। प्रीतीपात्र।
किंत बैसला मना। येके ठांई पडेना।
म्हणोनिया पांचजणा। मेळविलें।।
पांच जण वाटे करिती। तों ते पुत्र नायकेती।
निवाडा नव्हेचि अंती। भांडण लागलें।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView