अद्भूत वनसिध्दी

Date: 
रवि, 22 जुलै 2012

अद्भूत वनसिध्दी
सदा सेवि अरण्य तारूण्यकाळी।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी।
चळेना मनी निश्र्चयो दृढ ज्याचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।54।।

श्रीरामदास लग्नाच्या बोहल्यावरूनच निघून अज्ञातवासाला गेले. अथवा देश हिंडत राहिले. रानावनांत तपस्या करीत बसले. मागील चव्वेचाळीसाव्या श्लोकाप्रमाणेच, या श्लोकाच्या पहिल्या ओळीत, तरूणपणी अरण्यात जाण्याच जो उल्लेख आहे, तो श्रीरामदांचा स्वत:बद्दलचा अनुभव सांगतो. उपनिषदांच्या काळात बाळपणीच ऋषीमुनींच्या संगतीत वनात राहून विद्या होत होती. श्रीकृष्णांचे बालपण रानावनाच्या दऱ्याखोऱ्यांच्या सान्निध्यात, डोंगरात गेले. पांडवांना वनवास भोगावा लागला. खुद्द श्रीरामंाना लहानपणी विश्र्वामित्रंाच्या यज्ञरक्षणार्थ रानात जावे लागले. त्यापुढे पित्याच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी वनात जावे लागले. या वनांतराने कोठे कोणाचा नाश झालेला नाही. तर त्या निमित्ताने समाजाचा आणि त्या व्यक्तीचा मोठेपणा विस्तारला.

तेव्हा अरण्यसेवनाचा हा उपदेश प्राचीन परंपरा पोसणाराच आहे. रानाची अवघ्या जनांना मोठी भीती. रान म्हटले की साप, नाग, विंचू, जीवजीवाणू, वाघ, सिंह, भूतेखेत, अशा भीतीप्रेरक कल्पनांचे थैमान मनात होते. म्हणून वननिवसा हा नको, असे वाटते. पण या खोट्या कल्पना-सागरात वननिवास या श्लोकाची दुसरी ओळ भक्ताला डुंबू देतच नाही. वन हे धैर्य, शांती, सामर्थ्य देते, ही वनसिध्दी!! या दृष्टीने खऱ्या भक्ताला तिसऱ्या ओळीत असलेला निश्चय दिसतो. म्हणून असा मनुष्यच फक्त सर्वोत्तम रामाचा धन्य झालेला दास असतो.

स्वत:चे अरण्यसेवन रामदासांनी पहिल्या ओळीत सांगितले आहे. श्री ज्ञानेश्र्वरांचे बाळपणाचे ज्ञान ज्ञानेश्र्वरीच्या अध्याय 6, ओवी 4 तसे 52मध्ये आपापत: दिसेत. “बाळपणीच सर्वज्ञता” असा तेथे उल्लेख आहे. मात्र स्वत:चा म्हणून नाही, हे उघड आहे.

मनाचे ‘अभंग’रूप
वेदी तोचि शास्त्री सर्वाठायी तोचि। पुराणत तोचि अंत:करणी।।1।।
नामा सदा ध्यायी नाम सदा ध्यायी। रामनाम ध्यायी अरे मना।।2।।
नामा म्हणे देव नाही पुनरूप। केशवनाम सोपे उच्चारी बापा।।3।।
- नामदेव महाराज

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView