आहे, आहे, नाही नाही!

Date: 
रवि, 1 मार्च 2015

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
परेहून पर्ता न लिंपे विवर्ता।
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे।
परी संग सोडूनि सुखे रहावे।।190।।

मागल्या श्र्लोकात हे सगळे विश्र्व कसे निर्माण झाले, याबद्दल शास्त्रज्ञांनी सांगिलतेली शक्यता दिलेली आहे. एक अत्यंत लहान अशी वेव्हलेंग्थ असलेल्या वस्तूपासून हे विश्र्व निर्माण झाले. आता पुन्हा प्रश्र्न आलाच की, त्या वस्तूचा निर्माता कोण? या प्रश्र्नाचे उत्तर विज्ञान देत नाही. तत्वज्ञान ते आपल्या चिंतनातून शोधून काढण्याचा प्रयत्न करते.
जेथून कोठून ही निर्मिती झाली, त्या शक्तीला तुम्हाला कार्यकर्ता म्हणता येणार नाही, असे या श्र्लोकाची पहिली ओळ सांगते. त्याशक्तीने ही सृष्टी निर्माण केली नाही, आणि ती शक्ती या जगाचे पोषणही करत नाही. दुसरी ओळ म्हणते की, असा तो निर्माता, तुम्ही ज्याला ‘पर’ म्हणजे उच्च समजता, त्याही पलिकडे परतणाऱ्या कोटीतला आहे. तो विर्वतामध्ये म्हणजे मायेच्या घोटाळ्यात लिंपला जात नाही. तिसरी ओळ सांगते की, असे असले तरी अशा निर्विकल्प वस्तूची तुम्ही कल्पना करीत जावे. एकशे छपन्नाव्या श्र्लोकात अर्तकरूपाचा तर्क करण्यामागे जे तत्वज्ञान आहे, तेच येथेही आहे. आणि येथे चौथी ओळ सांगते, त्याप्रमाणे, सगळ्याचे सार अलिप्तपणाचे सुख घेण्यात सामावलेले आहे.

तुम्ही म्हणाल की, मुळाबद्दल तुम्ही काहीच माहिती संागत नाही. पण या न सांगण्यातच सांगणे होऊन जाते, असे एकशे अठ्याण्णवाव्या श्र्लोकाच्या संदर्भात आपण पाहून चुकलो आहोत. सृष्टीचा जन्म सांगायचा प्रयत्न नासदीय सूक्ताने केला आहे, तो पुढल्या श्र्लोकाच्या निमित्ताने आपण पाहू.

मनोबोधाचे ओवीरूप
तेणें बहुत दु:खी जाला। देखोनियां उभड आला।
प्राणी आकं्रदो लागला। दैन्यवाणा।।
तवं ती अवघीं सावध जाली। म्हणती बाबा बाबा जेऊं घाली।
अन्नालागी भिडकली। झडा घालिती।।
गांठोडे सोडूनि पाहाती। हातां पडिलें तेंचि खाती।
कांही तोंडी कांही हातीं। प्राण जाती निघोनी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView