इंद्रदेवाचे रहस्य

Date: 
रवि, 23 नोव्हें 2014

जगी द्वादशादित्य हे रुद्र आक्रा।
असंख्यात संख्या करी कोण शक्का।
जगी देव धुंडाळिता आडळेना।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेंना।।176।।

मागल्या श्र्लोकात म्हटल्याप्रमाणे, विज्ञानाने या जगाचे आदिकारण शोधून काढता येत नाही. विज्ञानेपक्षा तत्वज्ञानामध्ये चर्चेची कक्षा विस्तृत असते. तेथे वैयक्तिक शोध आणि अनुभव यांना स्थान रहाते. तो शोध श्रीरामदासांनी गेल्या श्र्लोकापासून घ्यावयास सुरुवात केली आहे. या श्र्लोकात ते म्हणतात, जगात बारा आदित्य आहेत आणि अकरा रुद्र आहेत. शक्र म्हणजे इंद्र तर असंख्य आहेत. यामुळे जगात देव धुंडाळायला गेले तर तो मिळतच नाही. आणि त्याचा मुख्य कोण आहे, ते अर्थातच त्यामुळे सापडत नाही.

वरवर पाहता या श्र्लोकामध्ये नुसते प्रश्र्न उपस्थित केलेले दिसतात. पण उत्तराचा एक सूक्ष्म धागा येथे सुरू होतो. इंद्र हे असंख्य म्हटलेले आहेत. इंद्र हा देवांचा देव तर तो वास्तविक एकच हवा; पण इंद्र काही एक नाही. इंद्र हे पद आहे. इंद्रपदासाठी अनेक तपे झाल्याचे प्राचीन वाङ्मयात आपणास वाचावयास मिळते. इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी तपेच नव्हेत, तर युध्देसुध्दा झाली आहेत. या सगळ्यावरून इंद्र असंख्य होऊन गेले, हे श्रीरामदासांचे म्हणणे सरळच आहे. पण देवांचा देव याची संख्याच असंख्य असली, तर त्या अत्युच्च स्थानाची महती अगदीच सामान्य आहे असे झाले. पण प्रत्येक सामान्य माणसात देव म्हणजे इंद्र आहे अशी कल्पना केली, तर मग वरील विधानांची संगती लागते. एकशे बहात्तराव्या श्र्लोकात
एकाच मनशक्तीमध्ये एक चांगला फाटासुध्दा कसा असतो, याचे वर्णन आहे. या मूळच्या मनशक्तींची इंद्ररूपाशी तुलना केली तर काही सत्य आपल्या हाती येईल.

मनोबोधाचे ओवीरूप
प्रपंच विचारें पाहतां। हें सकळ जोडे न जोडे माता।
हें शरीर जयेंकरिता। निर्माण जाले।
लांब तरी ते माया। काय कराविया सहस्त्र जाया।
परी भुलोन गेलों वायां। मकरध्वजाचेनी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView