इंद्रिय रहस्य

Date: 
रवि, 30 नोव्हें 2014

तुटेना फुटेना कदा देवराणा।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा।
कळेना कळेना कदा लोचनासी।
वसेना दिसेना जगी मीपणासी।।177।।

मागल्या श्र्लोकात इंद्र म्हणजे प्रत्येक माणसाची मन:शक्ती असते, असे आपण म्हटले. साम्यवेदाच्या प्रस्तावना पान चौदावर पंडित सातवळेकरजींनी तसाच अर्थ दिला आहे. इंद्र हे पद घ्या. अध्यात्मामध्ये इंद्र म्हणजे जीवात्मा किंवा अ्रात्मा. या आत्म्याची शक्ती ‘इंद्रिय’ (इंद्र+य) इंद्राची शक्ती दाखविण्यासाठी इंद्रिय हा शब्द बनला आहे. ‘इन-द्र’ या शरीरात छिद्रे या आत्मशक्तीने केली आहेत. ‘मी पाहणार’ असे याने म्हणताच, नेत्राच्या ठिकाणी छिद्र उत्पन्न झाले. असा मी श्र्वासोच्छ्वास करणार म्हणताच, नाकाच्या ठिकाणी छिद्र उत्पन्न झाले. शरीरामध्ये अनेक छिद्रे याने केली म्हणून ‘इदं+द्र’ हा झाला. त्याचा संक्षेप होऊन ‘इंद्र’ हे पद बनले आहे.

असा हा इंद्र अध्यात्मामध्ये आहे. अर्थात् व्यक्तीच्या शरीरात असलेला इंद्र होय.
इंद्राचे वर्णन आपल्या अंत:शक्तीच्या अंगाने आपण पत्करले म्हणजे त्या श्र्लोकाचा आपोआप अर्थ लागतो. गेल्या श्र्लोकात आणि एकशे बहात्तराव्या श्र्लोकात पाहिल्याप्रमाणे, या आतल्या इंद्राचे जे विवेकरूप आहे, ते श्र्लोकाच्या वर्णनाप्रमाणचे असणार. न फुटणारे, न चळणारे, न ढळणारे. आता तिसरी ओळ जी येते ती चक्षूकडे, म्हणजे इंद्रियाकडे. अर्थात् इंद्राच्या अविवेकी (अहंकारी) बाजूकडे वळते. इतर अनेक श्र्लोकात, उदाहरणार्थ एकशे एकाहत्तराव्या श्र्लोकात, डोळ्याला परमसत्य दिसत नाही, याची आपण चर्चा केली आहे. म्हणून चौथी ओळ तेथलेच सत्य पुन्हा संागते की, हे न दिसणे, अहंकारामुळे आहे.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘परलोकसंपर्क मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 13ची मंत्रसंलग्न ओवी लेखकच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
ऐसे जे महानुभाव। दैविये प्रकृतीचें दैव।
जे जाणोनियां सर्व। स्वरूप माझें।।194।।
अर्थ: जे महासामर्थ्य महात्मे, केवळ दैवीसंपत्तीचे सौभाग्यच असे जे माझे सत्यस्वरूप सवश: जाणून प्रेमाने मला भजतात.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView