एका खिसेकापूची गोष्ट

Date: 
रवि, 26 ऑक्टो 2014

एक उनाड विद्यार्थी होता. त्याची खिसे कापणाऱ्या एका टोळीप्रमुखाशी गाठ पडली. हा टोळीप्रमुख या उनाड विद्यार्थ्यास म्हणाला, “तू शाळा शिकून काय करशील? “ तो विद्यार्थी म्हणाला, “नोकरी करीन. “ टोळीप्रमुख म्हणाला, “नोकरी करून तुला काय मिळेल? “ तो विद्यार्थी म्हणाला, “पैसे मिळतील. “ टोळी प्रमुख म्हणाला, “ठीक आहे, पैसे मिळाल्यावर तू कोठे ठेवशील? “ तेव्हा हा विद्यार्थी म्हणाला, “माझ्या खिशात. “ टोळीप्रमुख म्हणाला, “ठीक आहे. तू दहा वर्षे शिकणार, मग नोकरी बघणार, ती तुला मिळणार, त्या नोकरीत पैसे मिळणार व ते मिळालेले पैसे तू खिशात ठेवणार. या सर्वातून तू पास होशील, तुला नोकरी मिळेल याची खात्री नाही. याऐवजी एवढे सगळे करून लोकांनी खिशात ठेवलेले पैसे नुसते काढून घेण्याची विद्या मी तुला शिकवतो. म्हणजे स्वत: डॉक्टर आणि वकील न होता, एका महिन्यात तू डॉक्टरने कमावलेले कमावशील, आणि दुसऱ्या महिन्यात वकीलाने कमावलेले कमावशील. “

हा उपदेश त्या उनाड विद्यार्थ्याला ताबडतोब पटला. मग त्याने खिसे कापण्याची विद्या संपादन केली. दहावीस वर्षांनी त्याचा एक मित्र फौजदार झाला. तेव्हा त्याने खिसेकापूला पकडण्याची विद्या अंमलात आणली. आणि त्याचा दुसरा एक मित्र शिकून जेलचा अधिकारी झाला होता. त्याच्या ताब्यात हा बंदी म्हणून घातला. श्रीरामदास या श्र्लोकात विद्येविद्येमधला फरक स्पष्ट करीत आहेत. प्रथम कष्टाने आणि नंतर खरे सुख देणारी विद्या या निरनिराळ्या आहेत. तिसर ओळ म्हणते या दोन्हीचे स्फुरण एकाच मनात निर्माण होऊ शकते. विवेकाने हे स्फुरण खऱ्या सुखाकडे न्यायचे असते.

मनोबोधाचे ओवीरूप
जरी रूणानुबंध असेल। तरी मागुती भेटी होईल।
नाही तरी संगती पुरेल। येचि भेटीने तुमची।।
ऐसें बोलोन स्वार होये। मागुती फीरफिरों पाहे।
वियोगदु:ख न साहे। परंतु कांही न चले।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView