एका दिव्यावर दुसरा

Date: 
रवि, 11 जाने 2015

जनीं भक्त ज्ञानी विवेका विरागी।
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी।
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेने योगें समाधान बाणे।।183।।

ब्रह्मविद्येपर्यंत पोचवणारा गुरू कसा असतो, त्याचा नमुना बुध्दाच्या पूर्वायुष्यात मिळतो. गुरूच्या अंत:करणाचे औदार्य बुध्दाच्या एका गोष्टीत सांगितले आहे. ते असे. बोधीस्थिती प्राप्त होण्यापूर्वी गौतम हा आळारकलाम नावाच्या एका गुरूकडे ब्रह्मचारी म्हणून राहिला होता. जेव्हा गौतमाचे अध्ययन संपले, तेव्हा गुरूने त्याला म्हटले, “मला तुझ्यासारखा गुणी शिष्य भेटला ही केवढी आनंदाची गोष्ट!मला ज्या काही विद्या अवगत होत्या, त्या सर्वात तू आता पारंगत झाला आहेस. मला येते ते तुलाही येते. आम्हा दोघांमध्ये आता काहीच फरक उरला नाही, म्हणून आपण दोघे मिळून आपल्याकडील पाचशे शिष्यांच्या अध्यापनाची व्यवस्था करू या. “

असा हा शिष्याला सर्वस्व देणारा खरा गुरू.
अर्थाच्या दृष्टीने गुरूची लक्षणे श्रीरामदासांनी या श्र्लोकात सरळच सांगितली आहेत. भक्त, ज्ञानी, विवेकी, विरागी,कृपाळू (कृती करणाऱ्याचे पालन करणारा.), उदार मनाचा, क्षमाशील, योगी, दक्ष, व्यत्पन्न, चतुर अशा गुरूच्या संगतीने समाधान मिळेल. कालिदासाच्या उपमेप्रमाणे, एका दिव्यावर दुसरा दिवा लावून ब्रह्मच दिसते. पुढल्या श्र्लोकाच्या अखेरीला आणि एकशे पंच्याऐंशिव्या श्र्लोकात, श्रीरामदास आणि श्रीदत्ताचे गुरू यांचे विवेचन होईल.

मनोबोधाचे ओवीरूप
आतां भलतैसें करावें। परि द्रव्य मेळऊन न्यावें।
रितें जातां स्वभावें। दु:ख आहे।।
ऐसी वेवर्धना करी। दु:ख वाटले अंतरी।
चिंतेचिये महापुरी। बुडोन गेला।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView