कळविण्यास आनंद वाटतो

Date: 
रवि, 10 मार्च 2013

कळविण्यास आनंद वाटतो
मुखीं राम त्या काम बाधू शकेना।
गुणें इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना।
हरीभक्त तो शक्त कामास मारी।
जगीं धन्य तो मारूती ब्रह्मचारी।।87।।

इंग्रजी राज्य होते, तेव्हा एक गंमतीची पध्दत होती. पत्रात सुरुवातीला किंवा मध्ये कोठेतरी एका वाक्याचा समावेश असे. “वुई हॅव द ऑनर टू इन्फॉर्म यू” किंवा “गव्हर्नमेंट इज प्लाज्ड टू राईट यू-“ असे ते वाक्य असे. म्हणजे “सरकारला आनंदपूर्वक तुम्हाला कळविण्यास अभिमान वाटतो –“किंवा “कळवण्यास आनंद वाटतो की – “अशा मतितार्थाचे ते लिहिणे. मग एखाद्याला त्याच्या मर्जीविरुध्द काही कळवायचे असेल तरी भाषा अशीच! एखाद्याला नोकरीवरू कमी करायचे असेल तरी भाषा तीच! गोड बोलणे, गोड लिहिणे हा साहेबाचा हातखंडा होता. “मुखी राम बगल में छुरी” अशी ती अवस्था!

रामाचे, नाव मुखाने घेतले तर विषयवासना बाधत नाही, असे सत्याऐंशीव्या श्लोकाची पहिली ओळ सांगते. दुसर ओळीचा पहिलाच शब्द ‘गुणे’ म्हणजे गुणावर भर देतो. रामनामाची संख्या किती याऐवजी रामनाम घेताना चित्तशुध्दी गुण किती, हा प्रश्र्न आहे. आणि मन रामाला खरेखुरे समर्पित केले तर माणसाला धीर वाटतो. धीर चुकत नाही. म्हणजे चळत नाही. हरीची भक्ती मनाचा कमकुवतपणा, विषयवासना यांना मारण्यासाठी शक्तिमान असते. याचे उदाहरण म्हणून ब्रह्मचारी मारूतीचे श्रीरामदासांनी दिले आहे.
शहाऐंशीवा श्लोक व पंच्याण्णवावा श्लोक म्हणजे दोन टोकाची उदाहरणे आहेत. जन्माबरोबर प्रभुशक्ती लाभलेला मारूती आणि मृत्यूच्या क्षणी प्रभुशक्ती लाभलेला अजामिळ. हा अजामिळ भेटेल श्र्लोक पंच्याण्णवमध्ये.

मनोबोधाचे ओवीरूप

देह विकार पावले। सुखदु:खे झळबले।
असो ऐसे गुंडाळले। मायाजळी।।
ऐसे दु:ख गर्भवासी। होते प्राणीमात्रासी।
म्हणोनिया भगवंतासी। शरण जावे।
जो भगवंताचा भक्त। तो जन्मापासून मुक्त।
ज्ञानबळे विरक्त। सर्वकाळ।।
ऐशा गर्भवासी विपत्ती। निरोनिल्या येथामती।
सावध होऊन श्रोतीं। पुढे अवधान द्यावे।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView