कामविकार आणि मदन

Date: 
रवि, 10 फेब्रु 2013

जेणें जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसीं अती आदरें गूण गातो।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें
परी अंतरी नामविश्वास तेथें।।83।।

श्रीशंकरांानी मदनाला जाळून टाकल्याची कथा प्रसिध्द आहे. पण या श्लोकांत ही पौराणिक कथा प्रमुखतेने अभिप्रेत आहे असे वाटत नाही. एक तर मदन असा स्पष्ट उल्लेख या श्लोकात नाही. तेव्हा भाष्यकारांना येथे मदन नष्ट करण्याच्या कथेची आठवण करून देण्याचे कारण कोणते?
गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आणि पुढेही अनेकदा माणसाचे जे शत्रू सांगितले आहेत, त्यात काम हा पहिला शत्रू सांगितला आहे. तेव्हा श्रीशंकरांनी एखाद्या मदनाला मारले या मोठेपणापेक्षा त्यांनी सर्वश्रेष्ठ कामशत्रूवर ताबा मिळवला होंता हे थोरपणअ अधिक शोभून दिसेल.

श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत शंकाराचे वर्णन प्रचंड ज्ञानी आणि वैराग्यशील असे केले आहे. तेव्हा काम याचा प्रतीकार्थाने मदन असा अर्थ करावयाचा असेल तर तो फक्त प्रतीक अर्थानेच करता येईल, प्रत्यक्ष अर्थाने नव्हे. श्रीशंकरांची ज्ञान आणि वैरागय ही सामर्थ्ये आहेत. अर्थात् वैराग्यात आत्मसंयम आला आणि आात्मसंयमाला काम जिंकण्याची सवय सहजतेने येऊन गेली.
पार्वती अणि शंकर यांचा विवाह झाला तेव्हा श्रीशंकरांना मोह पाडण्यासाठी मदन आला होता; पण श्रीशंकरांच्या आत्मसंयमामुळे त्याचे काही चालले नाही आणि तो स्वत:च भस्म होऊन गेला. या प्रतीकात्मक कथेमध्ये मदनाचे जळणे हे तात्कालकि होते. श्रीशंकरांनी कामावर मिळवलेला विजय हा सतत होता, एखाद्या आख्यायिकेपुरता नव्हता. म्हणून श्रीरामदासांनी मदन हा शब्द न वापरता काम हा शब्द वापरला आहे.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘उद्योगसिध्दि’ मंत्र या साधनेसाठी अध्याय 8 श्लोक 14 ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे)
नातरी चेइलियानंतरे। न बुडिजे स्वप्नींचेनि महापुरे।
तवी माते पावले ते संसारे। लिंपतीचि ना।।153।।
अर्थ: जागे झाल्यावर जसे कोणी स्वप्नातल्या महापुरात बुडत नाही, तसे जे मद्रूपाला येऊन पोचले, ते संसाराच्या मळाने कधीही लडबडत नाहीत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView