कार्यशुध्दीच्या उपायाचे स्वरूप

Date: 
रवि, 22 मार्च 2015

नव्हे जाणता नेणता देवराणा।
न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां।
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
श्रुति नेणती नेणती अंत त्याचा।।193।।

आपल्या मनाच्या अनंत लालसांमुळे जे कर्म घडते, त्यातून नाना तऱ्हेची विषे निर्माण होतात. त्याला आपण दु:ख, संकटे अशी नावे देतो. मूळच्या अशंातीमुळे हे सगळे दुष्परिणाम घडत असतात. त्या अशांतीची शांती करावयाची म्हटली तर, शांत असा एखादा आदर्श आपल्यापुढे हवा. तो आदर्श म्हणून श्रीरामदास रामाचा उल्लेख करतात. रामाला पुढे करतात.

मग हा आता तुमचा देव आहे तरी कसा? या श्र्लोकात श्रीरामसाद सांगत आहेत आहेत की त्याला जाणता येईल असेही नाही. आणि त्याला जाणता येणार नाही असे नाही असे नाही. वेदशास्त्रे, पुराणे यांनासुध्दा देवश्रेष्ठांच्या रूपाचे वर्णन करता आले नाही. तिसरी ओळ संागते, देव हा स्वत: दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. पण दृश्य अदृश्याचा साक्षी मात्र आहे. श्रुतींना म्हणजे वेदांना त्यांचा अंत माहीत नाही आणि जन्म माहीत असण्याचे कारण नाही. कारण खुद्द श्रुतींनाच त्याने जन्म दिला आहे.

आणखी ऐक श्र्लेषात्मक टिप्पणी येथे केली पाहिजे. शांतीचा आदर्श म्हणून राम आपण म्हणतो. पण रामाचे चरित्र पाहिले तर तो चरित्रात अनेकदा चंचल, दु:खी, अशांत असा स्वत:च झालेला दिसतो. तर मग त्याचा आदर्श उपयोगी कसा पडेल? त्याचे रहस्य आपल्याला पुढल्या श्र्लोकाच्या विवेचनात सापडेल.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘धान्यसमृध्दी’मंत्र या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 17ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
पै जयाचेनि अंगसंगे। इये प्रकृतीस्तव अष्टांगे।
जन्म पाविजेत असे जगें। तो पिता मी गा।।269।।
अर्थ: ज्याच्या सहवासाने या आठ प्रकारच्या प्रकृतीमायेपासून हे नामरूपात्मक जग उत्पन्न होते, तो जगताचा पिताही मीच आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView