कीर्ति कशी मिळेल?

Date: 
रवि, 4 सप्टें 2011

कीर्ति कशी मिळेल?
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हे चि क्रिया धरावी।।
मना चंदना परी त्वां झिजावें।
परी अंतरी सज्जना नीववावें।।8।

एका तत्वज्ञान्याने म्हटले आहे की, जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास आणि इतर माणसे हसत होती. जन्मभर असा वाग की, तू मरताना इतर लोक रडत असतील, आणि तू हसत असशील.
जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची शक्ती सतत जात असते. माणूस सतत म्हातारा होत असतो. तो दुर्बख होत असतो. झिजत असतो. हे जर खरे, तर मग ते झिजणे स्वार्थासाठी का म्हणून? एकादा चोर ’ चोरी’
करून तुरूंगात गेला तर त्याचे कोणी कौतुक करीत नाही पण तो चार जणांच्या कामासाठी, देशासाठी तुरूंगात गेला तर त्याचे कौतुक होते. त्याच्या कुटुंबाला समाज नाना तऱ्हेची मदत करतो. नि:स्वार्थ हा एक प्रकारचा उत्कृष्ट स्वार्थ आहे. कारण त्याने कालांतराने स्वार्थ साधतो आणि त्यात नि:स्वार्थाचे चालू सुखही मिळते.
नि:स्वार्थामध्ये थोडे कष्ट पडले, तरी त्यातून तीन फायदे होतात. मन शांत राहते. नंतर नि:स्वार्थ कामाचे कौतुक होते आणि अखेर भौतिक लाभही काही कमी पडतो असे नाही. मात्र या गणिती हिशेबाचा नि:स्वार्थ नसावा. खरीखुरी, कळकळीची शंाती आणि नि:स्वार्थ असावा.

मानस ज्ञानेश्र्वर
(संसारसौख्य ’ मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7 श्लोक 22ची मंत्रसंलग्न ओवी. लेखाकच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
ऐस जेणे जे भाविजे। ते फळ तेणे पाविजें।
परी तेही सकळ निपजे। मजचि स्तव।।46।।
भक्ताने जे फळ मनात धरले, तेच फळ त्याला मिळते, परंतु ते फळही माझ्यापासून उत्पन्न झालेले असते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView