क्र. 2 ‘राग ‘कसा जिंकावा?

Date: 
रवि, 19 जाने 2014

विचारुनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त ते ही निवाले।
बरें शोधिल्यावीण बोलो नको हो।
जनीं चालणें शुध नेमस्त राहो।।132।।

मनुष्य स्वभावाच्या पहिल्या छटांचा मागल्या श्र्लोकात विचार केला. दुसरी प्रमुख छटा म्हणजे रागाची. त्या रागाचा परिहार कसा करावा, ते हा श्र्लोक स्पष्ट सांगतो.
रागाचे दोन प्रमुख परिणाम होतात. रागावलेला मनुष्य संतापाने दुसऱ्याला टाकून बोलला नाही, तरी त्याचा आतल्या आत भडका उडतो. तो दाबून ठेवला की शरीरात त्याचे भयंकर परिणाम होतात, असे विज्ञान सांगते. म्हणून बहुतेक रागीट माणसे आपला राग भराभर बोलून टाकतात. त्यामुळे साहजिकच दुसरी माणसे दुखावली जातात. रागातून राग पेटतो. गैरसमज, सूड, द्वेष, हिंसा, भयंकरता यातून निर्माण होतात.
यावर उपाय काय? तर पहिली, तिसरी व चौथी ओळ त्या उपायांची यादी देते. 1. विचार करून बोल हा पहिला उपाय. राग आल्यावर दहा अंक मोजावे मग बोलावे. त्याचे मर्म हेच आहे. 2. दुसरा उपाय ‘विवंचून चाले ‘म्हणजे कृती अशी कर की परिणाम काय होईल, याची विवंचना तू प्रथमच कर. रागाची आग बाहेर टाकल्यानंतर मग जो भडका उडतो, त्याची विवंचना मागून करीत बसण्यापेक्षा, त्या रागाची कल्पना आधीच केली, तर पुढला अर्नथ टळेल. 3. बोलण्यापूर्वी ‘बरे ‘ म्हणजे सत्य काय आहे ते शोधून काढ. म्हणजे पश्र्चत्तापाची, ‘अरेरे, माझा गैरसमज झाला ‘असे म्हणण्याची पाळी येणार नाही. 4. लोकात शुध्दतेने वागावे. किल्मिष ठेवून वागू नये. मोकळ्या मनाने वागावे; म्हणजे राग बाधत नाही. हा चौथा उपाय झाला. 5. पाचवा उपाय म्हणजे नेमस्त रहा. नेमस्त म्हणजे नियम असलेला. आयुष्य एकदा नियमबध्द असले म्हणजे रागाचे झटके उसळून येत नाहीत.

ज्ञानेश्र्वरी मानस
(‘भूतशांती मंत्र ‘या साधनेसाठी अध्याय 9श्र्लोक 2ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
आणि धर्माचे निजधाम। तेविंचि उत्तमाचे उत्तम।
पै जया येतां नाही काम। जन्मांतराचे।।48।।
अर्थ: जे ज्ञान धर्माचे माहेरघर आहे आणि जे सर्वोत्तम आहे, त्याचा लाभ घडला असता, जन्ममरणाला जागाच राहत नाही.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView