क्र. 3: धैर्याचे सामर्थ्य

Date: 
रवि, 26 जाने 2014

हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी।
जेणे मानसीं स्थापिलें निश्र्चयासी।
दया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे।।133।।

मनुष्य स्वभावाचा तिसरा प्रकार म्हणजे धैर्यवान असण्याचा. हे धैर्य कशामुळे येते, याचे वर्णन हा श्र्लोक करीत आहे. दुसरी ओळ हा श्र्लोक कोणाबद्दल बोलत आहे, याचा उल्लेख करते. ज्याच्या मनाचा निश्र्चय झाला आहे, असा माणूस कोण, हे हा श्र्लोक संागत आहे.

निश्र्चय हा नेहमी अवघड गोष्टींबद्दल व्हावा लागतो. सिनेमा पाहण्याचा, नाटक पाहण्याचा, लाडू खाण्याच, रेशमी कपडे घालण्याचा कोणी हव्यास धरला तर त्याला ते करण्याचा कोणी निश्र्चय धरला, असे म्हणत नाही. काहीतरी संकट, काही तरी अवघड गोष्ट, धैर्याने म्हणजे निश्र्चयाने, पार पाडण्याचे वर्णन, हा श्र्लोक करीत आहे, हे उघड आहे. अशा धैर्यशीलाची लक्षणे हा श्र्लोक स्पष्टपणाने देत आहे. अशा माणसाजवळ किती गुण असतात, कोणती लक्षणे असतात ते पहा. 1. असा धैर्यशील मनुष्य हरीभक्त असतो. हरि म्हणजे ‘तृष्णा हरि’. खोट्या तृष्णा टाकल्या जाव्यात; अशी मागणी मागणारा तो असतो. 2. विरक्ततात हा धैर्यशीलाचा दुसरा धर्म आहे. शूराला विरक्ततेची जोड दैवी गुण देते. श्रीकृष्ण राजा असूनही योगी होता. शिवाजी श्रीमान् योगी होता. रागीट माणसाप्रमाणे विरक्ताचेही रक्त तापते. ते तौलनिक दृष्टीने. अर्थात् ते विरक्तीमय. म्हणून विशेष रक्तमय. 3. विज्ञानप्रेमी म्हणजे बहुत अभ्यासप्रेमी. त्याशिवाय धैर्य येणार नाही. 4. अशा माणसाला पाहूनसुध्दा धीर येतो. 5. स्पर्शाने तर पुण्य मिळते. अर्थात् धैर्यपुण्य. 6. ज्याचा स्वत:चाच निश्र्चय झाला आहे, अशाचे भाषण ऐकून ऐकणाराही संदेहशून्य होतो, तो धीट होतो.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘भूतशांती मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 3ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे. )
तैसी अहंममतेचिये लवडसवडी। मातें न पावतीचि बापुडीं।
म्हणोनि जन्ममरणाचे दुथडी। डहुळिते ठेली।।62।।
अर्थ: अहंमन्यतेच्या गडबडीत हे बिचारे जीव माझ्यापर्यंत येऊन पोचत नाहीत, म्हणून जन्ममरणाच्या दोन ्थडीला डळमळत बसतात.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView