क्र.1: भय ‘अभय’ कसे होईल?

Date: 
रवि, 12 जाने 2014

भजाया जनीं पाहतां राम येकु।
करी बाण येकु मुखी शब्द येकु।
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु।
धरा जानकीनायकाचा विवेकु।।131।।
मनुष्य स्वभावाच्या चार पातळ्यांपैकी, किंवा चार तऱ्हांपैकी भय ही क्रमांक एकची महत्त्वाची छटा. प्रथमच सांगून टाकले पाहिजे की, भय, राग, धैर्य, शांती या तऱ्हा संपूर्णत: अलग असू शकत नाहीत. पण जे काही प्रधान वैशिष्ट्याचे चार प्रकार आहेत, त्यापैकी ‘भयवैशिष्ट्य’हे पहिले आहे.
गीतेने एक मजेदार साखळी जोडली आहे. पुण्य क्षीण झाले की, मृत्यू लोकावर माणूस येतो. पुढे रोगापासून मृत्यूपर्यंत या तऱ्हा आहेत, त्यापैकी जन्म ही पहिली तऱ्हा आहे. त्यामुळे जन्म हे सर्व दु:खाचे मुख्य कारण आहे, असे गीता म्हणते. संचिताचा मोठा साठा संपला की, मृत्यूलोकी येताना भयग्रस्त अवस्थेशिवाय कोणती असणार? तेव्हा कोणतीही उत्पत्ती (किंवा जन्म) ही भयातून होत असते.सुख मिळणार नाही हे ते भय. या भयापासून सुख मिळवण्याचे अनेक संकल्प, म्हणजेच विकल्प निर्माण होतात. संकल्प हा शब्द विकल्प या अर्थानेसुध्दा माणसाला कसा अभिप्रेत असतो, हे आपण गेल्या श्र्लोकाच्या निमित्ताने पाहिले आहे. हा चालू श्र्लोक त्या विकल्पाचे निराकरण करतो. सर्व सुखसंकल्पाचे सर्वात मूळ भय कसे आहे, तेही आपण सुरुवातीला पाहिले. मागल्या श्र्लोकांच्या अनुसंधानाने हा श्र्लोक उपाय सांगतो, तेव्हा भयाच्या व्याधीवर तो मूलत: प्रहार करीत आहे. हा धागा ध्यानात धरला पाहिजे. श्रीरामदासांचा हा प्रहारी उपाय म्हणजे अर्थात् श्रीरामानाम आहे. ज्याचे वचन बदलत नाही, ज्याचा बाण बदलत नाही अशा रामापेक्षा सतत बदलावयास लावणाऱ्या मनाच्या भयावर दुसरा उपाय कोणता असेल?

ज्ञानेश्र्वरी मानस
(‘भूतशांती’मंत्र, या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 1ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तैसें जे जाणितलेयासाठी। संसार संसाराचिये गांठी।
लाऊनि बैसावी पाटी। मोक्षश्रियेच्या।।46।।
अर्थ: ज्ञान व विज्ञान यांची समजूतदारपणे निवडानिवड झाली म्हणजे जन्ममरणाचा संसार या नामरुपात्मक संसाराशी गाठला जातो, आणि ते परम ज्ञान आपल्यास अक्षर मोक्षपदाच्या पीठावर नेऊन बसविते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView