क्र.4: शांतीचे महासामर्थ्य

Date: 
रवि, 2 फेब्रु 2014

नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी।
नसे लोभ ना क्षोभ हा दैन्यवाणा।
यहीं लक्षणीं जाणिजे योगिराणश।।134।।
क्रमांक चारचा स्वभाव प्रकार म्हणजे ‘शांत’स्वभावाच्या माणसाचा. या शांत स्वभावाच्या माणसाची लक्षणे 134व्या श्र्लोकभर पसरली आहेत. मागच्या श्र्लोकात धैर्यवंताचे लक्षण होते. हा श्र्लोक शांतिशीलाचे वर्णन करतो. धैर्याचे जर सामर्थ्य म्हणावयाचे, तर शांतीचे ‘महासामर्थ्य’ असेच वर्णन हवे. धीटपणामध्येसुध्दा भित्रेपणाचा गर्भित अंश असतो. शांतीमध्ये धीटपणा तर असतोच; पण त्यातून भय उणे झालेले असते. म्हणून या स्थितीचा अनुभव गुणातीत झालेला असतो. धैर्य ही सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या माणसाची पराकाष्ठा होईल, त्या सत्वगुणापलीकडे, गुणातीत मनुष्य शांतीसामर्थ्याचे महासामर्थ्य निर्माण करू शकेल. म्हणून हा श्र्लोक ह्या शांती सामर्थ्याच्या कक्षा एकामागून एक सांगत आहे. शांती पुरुषाची या श्र्लोकातील लक्षणे केवढी आहेत ती पाहा.
1. निर्गवीपणा: धैर्य असणाऱ्या माणसाला धैर्याचा गर्व असणे शक्य आहे. शांत माणसाला धैर्य असूनही त्याचा गर्व नाही. 2. वीतरागी: बी आणि इत दोन मिळून वीत हा शब्द झालेला आहे. त्याचा अर्थ गेलेला असा आहे. तेव्हा ‘वीतराग’याचा अर्थ ‘शान्त’ असो ओघाने आला. सुखाचे प्रेम ज्याचे गेलेले आहे, अशा विरक्त माणसाला खराखुरा राग येण्याचे कारणच नाही. 3. क्षमाशील: स्वार्थ नाही म्हटलानंतर असा मनुष्य दुखावला जाण्याचा संबंध नसतो. क्षमा ही त्याच्या स्वभावाची सहजता असते. 4. शांतीप्रेमी: 5. दयादक्ष: ज्या कारणामुळे क्षमा, त्याच कारणामुळे दया, पण लाचार नव्हे, तर ‘दक्ष-दया’ म्हणजे लायक लोकांना दया. 6. योगी म्हणजे युक्ताभ्यासपूर्ण 7. लोभी नाही असा. 8. राग नाही आणि मनाचा दीनपणा नाही असा. या सर्वांची संतुलता, महासामर्थ्य दाखवीत नाही, तर काय दाखविते? या सर्वांचे विज्ञान पुढील तीन श्र्लोकात.

मनोबोधाचे ओवीरूप
जाले आरत्र ना परत्र। प्रारब्ध ठाकलें विचित्र।
आपला आपण मळमूत्र। सेविला दु:खें।।
पापसामग्री सरली। दिवसें दिवस वेथा हरली।
वैद्य औषधें दिधली। उपचार जाला.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView