खरेखोटेपणा

Date: 
रवि, 20 नोव्हें 2011

खरेखोटेपणा
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे।।
मना सत्य तें सत्य वाचें वदावें।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।।19।।

अठराव्या श्लोकात रामावर एकाग्रता करण्याचे श्री समर्थांनी सांगितले आहे. पण राम म्हणजे सत्य आणि शौर्य यांचे प्रतीक. हाडामासाचा गोंडस पुतळा, हे काही रामाचे स्वरूप नाही. त्याच्या कणाकणांत भरलेली सत्यमयता हे त्याचे खरे सामर्थ्य.
त्या सूक्ष्म सत्यापर्यंत पोचण्यासाठी श्रीरामदास मनाला सांगतात की, तुला रामसामर्थ्य हवे असेल, तर प्रथम तू खरे बोलावयास शीक. भले त्यात सुरुवातील काही तोटेही असोत. पण श्रीरामदासांना मनुष्यस्वभाव माहीत आहे. मनुष्य भूक लागल्यावर ‘जेवण दे’ असे म्हणतो, तेव्हा सत्य बोलतच असतो. त्याने काही तो सत्यप्रिय ठरत नाही. म्हणून रामदासांनी असत्याची वाटच बंद करून टाकताना म्हटले आहे की, ‘तू खोटे बोलूच नकोस. ‘सत्या बोल किंवा खोटे बोलू नको. दोन्ही अर्धवर्तुळे, मिळून सत्याचा किल्ला मजबूत झाला. वास्तविक ‘प्रकाशात रहा’ याचाच अर्थ ‘अंधारात राहू नको’ असा असतो. पण सोयीचे अर्थ करणाऱ्या मनाला तो अधिक स्पष्टतेने सांगावा लागतो, तसा तो रामदासांनी सांगितला आहे.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘भाग्य स्वप्न मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7 श्लोक 27ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तेणे भूते भांबावली। म्हणोनि संसाराचिया आडवामाजी पडिली।
मग महादु:खाच्या घेतली। दांडेवरी।।171।।
‘द्वंदमोहाच्या’ या करणीने सर्व जीव गोंधळून गुरफटून गेले. म्हणून तर ते संसाराच्या अरण्यात येऊन पडले आहेत, आणि महादु:खाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. आपल्या शिष्याचे रक्षण केले. कसेही असो, भक्तांना रामाचे आणि रामदासांचे दुहेरी रक्षण मिळते, हे चांगलेच आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView