गणेश

Date: 
रवि, 9 मार्च 2014

वैज्ञानिक अन्वय: गणेश नामामध्ये मध्यम लहरीशक्तीचे प्राबल्य जास्त आहे. त्याच्या तुलनेचे अंदाजाने त्यात तेहेतीस टक्के लघुलहरी शक्ती आहे. यामुळे हा मंत्र सुप्त शक्ती हळूहळू जागृत करून देणारा आहे. “श्री” ही शब्दशक्ती मंत्रारंभी ठेवली की ही शक्ती अधिक तीव्र होते. मात्र हे जाणून घेणे इष्ट आहे की तीव्रशक्ती प्रत्येकासच पेलेल असे नव्हे. कोणास कोणती शक्ती उपयोगी पडेल हे त्या त्या व्यक्तीवर, व्यक्तीमत्वावर, तिच्या गरजेवर अवलंबून असते. सबघोडे बारा टक्के हा न्याय ठेवणे धोक्याचे आहे. मंत्रशक्तीचे स्वरूप नीट न समजता ती कशीतरी वापरली तर फायदा होत नाही. त्याचा बोल मात्र मंत्रशक्तीला येतो.
संास्कृतिक अर्थ: ‘गणानाम् पति: ‘-गणपती असा लोकवादी घोष करणारे हे दैवत लोकप्रिय झाले, यात काही नवल नाही. बुध्दिस्थानी गणेश देवतेची स्थापना झालेली आहे. महाभारत व म्हणूनच गीता, गणेशाने ग्रंथबध्द केली. वेदापासून अठरा पुराणांपर्यंत गणपतीचे उल्लेख पसरलेले आहेत.
उपयोग: बुध्दी तरल होण्यासाठी, संकटहरणासाठी, यश लाभण्यासाठी गणेशाचे नामस्मरण उपयोगी आहे. मात्र प्रत्येक उपयोगासाठी त्याचे वेगवेगळे नामपर्याय अधिक उपयुक्त होऊ शकतील.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView