गळकी पिशवी

Date: 
रवि, 16 ऑक्टो 2011

गळकी पिशवी
जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला।
छरी सेवटी काळमूखी निमाला।
महा थोर ते मृत्युपंथे चि गेलें।
कितीयेक ते जन्मले आणि मेले।।14।।

एक चमत्कारिक मनुष्य होता. तो रोज एका गळक्या पिशवीत एक किलोभर अन्न ठेवत असे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक किलोभर. खालून पिशवीला भोक होते, हे त्याला माहीत होते. अन्न गळत होते. पण पन्नास वर्षे हा आपला अन्न ‘साठवीत’ होता. आणि पन्नास वर्षात अठरा हजार दोनशे पन्नास किलो धान्य त्याने गमावले होते.
हा खुळा माणूस म्हणजे तुम्ही आणि मी. पोटाच्या गळक्या पिशवीत जन्मापासून रोज किलोभर धान्य टाकतो. ते गळून जाते आहे. पण पोट भरल्याचा आपला अभिमान काही गळून जात नाही. आपली सारी ही शक्ती जन्मापासून आपण व्यर्थ आणि वाया घालवीत आहोत, ही रामदांच्या चौदाव्या श्लोकाची सूचना आहे.
खाल्लेले अन्न वाया केव्हा जाते? तर त्यापासून मिळालेल्या शक्तीचा गर्व धरला म्हणजे. पण माणसाने जर असे ज्ञान करून घेतल, की मी जन्माला आलो, तो माझ्या काही कर्माने, शेवटी या जन्मातही मी मरणारच आहे. माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक आहे. तेसुध्दा शेवटी मरण टाळू शकले नाहीत, तर मी कसे टाळू शकणार? ही जागृती मी बाळगीन, तर माझे मागले कर्म शुध्द होईल. आणि मी बाळगीन, तर माझे मागले कर्म शुध्द होईल. आणि ते होता होता नवे वाईट कर्म घडणार नाही. मनाला शांती मिळेल.
कर्म, ज्ञान आणि त्या ज्ञानापासून शंाती, यांची सुरुवात चौदाव्या श्लोकापासून होत आहे.
मनाचे ‘अभंग’ रूप
जरा कर्णमूळी सांगो आली गोष्टी।
मृत्त्याचिये भेटी जवळी आली ।।1।। ।।धृ.।।
आता माझ्या मना होई समाधान। ॐ पुण्याची जाण कार्यसिध्दि ।।2।।
शेवटील घडी बुडतां न लागे वेळ। साधावा तो काळ जवळी आला।।3।।
तुका म्हणे चिंतीं कुळाची देवता। वारावा भोंवता शब्द मिथ्या।।4।।
-तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView