गुणांचा ‘चमत्कार’ही थांबवा!

Date: 
रवि, 5 ऑक्टो 2014

नसे अन्त आनंत संता पुसावा।
अहंकार विस्तार हा नीरसावा।
गुणेवीण निर्गूण तो आठवावा।
देहेबुधिचा आठऊं नाठवावा।।169।।

ज्ञानेश्र्वरांची गोष्ट प्रसिध्द आहे. त्या गात्या नावाच्या रेड्यच्या पाठीवर पखालवाला फटके मारीत होता. तेव्हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर कळवळले. त्यांना उलट प्रश्र्न विचारला गेला की, सगळ्यांचा आत्मा एक, तर जनावराचे दु:खही तुला झाले का? संतश्रेष्ठांनी स्वत:ची पाठी उघडी करून दाखविली. नामदेव महराज वर्णन करतात, “मारिती आसूड म्हैशियाचे पाठी। तोचि वळ उठी ज्ञानदेवा।।”

हा एक सद्गुणाचा चमत्कार आहे.
काही ख्रिस्ती संतांच्या शरीरावर क्रूसाची चिन्हे दिसतात. त्याबद्दल एका शास्त्रज्ञाने लिहिले आहे की, हा तर मनाचा ध्यास घेतल्यामुळे घडलेला खेळ आहे. ठीक आहे. मग तीन प्रतिप्रश्र्न उत्पन्न झाले. एक, मनाचा शरीरावर परिणाम मान्य झाला ना? दुसरा प्रतिप्रश्र्न, दुसऱ्याचे दु:खसुध्दा आपल्या शरीरावर परिणाम करू शकते ना? तिसरा प्रतिप्रश्र्न, असे दु:ख घेऊनसुध्दा संत आनंदी राहू शकतात, हे सिध्द झालेच ना?

यामुळे संतांचा अधिकारही सिध्द होतो. अंत नाही अश अनंत अस्तित्वाचा अनुभव कोणाला पुसावा? तर संतांना , असे श्र्लोकाची पहिली ओळ सांगते. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. अहंकाराचे निरसन होईल, असे दुसरी ओळ सांगते. तिसरी ओळ म्हणते की गुणांच्या चमत्कारापाशी न थांबता, गुणांच्या घोटाळत न पडता, एकदम निर्गुणालाच हात घालावा आणि चौथी ओळ संागते की, आपल्या देहबुध्दीचा घोष करीत बसू नये.
गुणाकडून निर्गुणाकडे जावे, असे गीतेच्या दुसऱ्या आणि चौदाव्या अध्यायात संागितले आहे. कारण चांगल्या गुणांचासुध्दा अखेर मोह पडतो आणि तो विस्तारत जातो. म्हणून तमोगुण, रजोगुण ओलांडून अखेर सत्वगुणाच्या सहाय्याने निर्गुणाकडे वळण्याचा उपदेश संत करतात. त्यामुळे अनंत सुखाची झेप सोपी होते, असा संतांचा अनुभव आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची।
वृत्ति गुंतली तयाची। जातां प्रशस्त न वटे।।
माया मात्र सिध्द केली। कांही सामग्री बांधली।
लेेकुरें दृष्टीस पाहिली।मार्गस्त जाला।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView