गुरू निवडताना काळजी

Date: 
रवि, 21 डिसें 2014

गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी।
मनीं कामना चेटकें घातमाता।
जनी वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता।।180।।

मुक्तिदाता म्हणजे संसारातल्या तापातून सोडवणारा मार्गदर्शक. तो कसा असावा, याची चर्चा 183पर्यंतचे श्र्लोक करीत आहेत. ह्या अनुषंगाने भारतीय संस्कृतीकोषात गुरूबद्दल आलेली माहिती पुष्कळ बोध देऊन जाईल.
प्रथम गुरू कसा असावा, हे सांगताना श्रीरामदासन म्हणत आहेत, गुरू कोटी कोटी दिसतात. मोठेमोठे मंत्रही अस्तित्वात आहेत. पण मंत्र देणारा गुरू हा स्वत: (मंत्राच्या सामर्थ्याने स्वत: मिळवण्यापेक्षा) आलेल्या साधकाकडून काहीतरी उपटावयास पहातो.
तेव्हा त्याच्या मंत्रात काही सामर्थ्य नाही, असे तो आपण होऊनच सिध्द करतो आणि ते लपविण्यासाठी कोणत्या तरी भाकड कथा सांगत बसतो.

उलट भारतातील गुरूपरंपरा मोठी आहे. गुरू म्हणजे वेदशास्त्राचे अध्यापन करणारा. या अर्थी पाणिनीने आचार्य, प्रवक्ता, श्रोत्रिय व अध्यापक असे चार प्रकारचे गुरू सांगितले आहेत. उपनीत बटूला वेदाचे अध्यापन करणारा तो आचार्य. ब्राह्मण, श्रौतसूत्रे व वेदांगे यांचे सार्थ अध्यापन करणारा तो प्रवक्ता, शिष्यांना वेदाची संथा देणारा तो श्रोत्रिय व कृत अर्थात वैज्ञानिक वा लौकिकसाहित्याचे अध्यापन करणारा तो अध्यापक होय. बौध्द धर्मातही गुरूचे महत्त्व असाधारण होते. संघात आलेल्या नवभिक्षुने दहा वर्षे सतत गुरूसान्निध्यात राहून अध्ययन केले पाहिजे, असा बुध्दाचाच उपदेश होता.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘परलोकसंपर्क मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 16ची मंत्रसंलग्न ओवी लेखकच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
तोचि जाणिवेचा जरी उदयो होये। तरी मुद्दल वेदु मीचि आहे।
आणि तो विधानातें जया विये। तो ऋतुही मीचि।।265।।
अर्थ: त्या शुध्द ब्रह्मज्ञानाचा जर उदय झाला, तर मग मुळी वेदही मीच आहे आणि त्या वेदाने सांगितलेल्या अनुष्ठानविधीने जो ऋतु करावयाचा तोही मीच.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView