गुरू ‘सत्कर्म’ शील कशासाठी?

Date: 
रवि, 28 डिसें 2014

नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु।
नव्हे निंदकु मछरू भक्तिमंदु।
नव्हे उन्मत्तु वेसनी संगवाधू।
जनी ज्ञानिया तो चि साधु अगाधु।।181।।

चटके करणारे, फसवणारे , चालकू (म्हणजे चलाख), द्रव्यलोभी, निंदक, हेवा करणारे, अभक्त, उर्मट, व्यसनासक्त अशा गुरूच्या संगतीपासून तोटा काय तो हाती येतो. ज्ञानी हाच खरा अगाध साधू होय. साधूची फोड स अधिक अधु, म्हणजे अधु माणसाबरोबर चालणारा, म्हणजे सत्कर्मशील. गुरू सत्कर्मशील असावा.
गुरूपरंपरतेले मूळचे गुरू, शिष्याकडून स्वार्थ साधण्याची मूळ प्रेरणा नसलेले असे होते.

गुरूने दक्षिणेबद्दल आगाऊ करार करू नये आणि त्याने गरीब विद्यार्थ्याला विनाशुल्क शिकवावे, असा समाजाचा कटाक्ष असे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ऐपतीप्रमाणे भरपूर गुरूदक्षिणा द्यावी, तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर भिक्षा मागून किंवा आपल्या हिंमतीवर पैसे मिळवून गुरूच्या उपकाराची फेड करावी, असाही सामाजिक संकेत असे. कौत्साने आपला गुरू वरतंतू याला दक्षिणा देण्यासाठी रघुराजाकडे 14कोटी सुवर्णनाणी मागितली होती, अशी कथा रघुवंशाच्या 5व्या सर्गात सांगितली आहे. उत्तंकाने आपल्या गुरूपत्नीला देण्यासाठी पोष्य राजाच्या राणीची अमूल्या कुंडले मागितली आणि ती राजाने उत्तंकाला दिली अशी कथा महाभारतात आली आहे. (आदिपर्व 3). या गोष्टीवरून गुरूदक्षिणेसाठी गुरू जे मागेल ते त्याला दिले पाहिजे, असा शिष्टसंकेत असल्याचे कळते. ही प्रतीके सगळी शिष्याच्या त्यागाची चाचणी घेणारी. सूक्ष्म अभ्यासाने हे लक्षात येईल.

मनोबोधाचे ओवीरूप
या ऐका कामाकारणें। जिवलगांसी द्वंद्व घेणें।
सखी तीच पिसुणें। ऐसी वाटती।।
म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन। जे मायेबापाचें भजन।
करिती न करिती मन। निष्ठुर जिवलगांसी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView