चंद्र, फांदी आणि ब्रह्म

Date: 
रवि, 22 जून 2014

महावाक्य तत्त्वादिकें पंचिकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे।
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडूनी चंद्रमा भाविजेतो।।154।।

गेल्या श्र्लोकात सांगितलेला सज्जन मनुष्य हाताने कृती करतो. म्हणून त्याच्या शब्दाला सामर्थ्य येते. ते कसे येते, त्याचा अनोखा दृष्टांत ह्या श्र्लोकात श्रीरामदास देत आहेत. महावाक्य पंचतत्व, पंचीकरणे, ‘म्हणजे पंचतत्वे व त्या पाचांची पंचवीस तत्वे ‘इत्यादी गोष्टीचा खुलासा सज्जन चांगला करू शकतो. त्याप्रमाणे तो तत्वज्ञान नुसते सांगत नाही, तर त्या तत्वज्ञानाचे फलस्वरूप तो जवळ जवळ दाखवू शकतो. इथे श्रीरामदास मनाच्या श्र्लोकातील एक उत्कृष्ट उपमा देतात. तिसऱ्या व चौथ्या ओळीत ती उपमा दिली आहे.

आकाशत द्वितीयेचा चंद्र सगळ्या ऋतूत स्पष्ट दिसेल असे नाही. त्यातून पाहणारा माणूस आणि चंद्राची दिशा ह्यामध्ये एखादे झाड असले, तर चंद्र पाहण्यास त्या झाडाचाच अडथळा येतो. अशा वेळी ज्या माणसाला चंद्र दिसलेला आहे तो माणूस एखाद्या डाव्या हाताच्या फांदीकडे पाहून म्हणतो, ‘तो पहा. त्या फांदीच्या वरच्या बाजूला आकाशात तुला चंद्र दिसेल. ‘ ती खूण पाहणाऱ्याला बरोबर लक्षात येते, आणि पटते. येथे श्रीरामदासांनी ब्रह्माला चंद्राची, महावाक्यांना फांद्यांची, दाखविणाऱ्याला सज्जनाची आणि पाहणाऱ्याला साधकाची उपमा दिली आहे. त्या उपमेच्या मर्यादेत ब्रह्म सज्जनामुळे कसे दिसेल, हे तत्वज्ञानाच्या मर्यादेवर चांगल्या रीतीने सुचविले आहे. मनाच्या अभ्यासाचा आणि ब्रह्माचा संबंध समर्थ उलगडून दाखवीत आहेत. 151 ते 159 ह्या श्र्लोकांचे काम मन आणि ब्रह्म संबंध दाखविण्याचे आहे. त्यापैकी हा एक सुबोध श्र्लोक.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसी लोकलाज होईल। वडिलांचे नांव जाईल।
आतां रुण कोण देईल। लग्नापुरते।।
मागें रुण ज्यांचे घेतलें। त्याचे परतोन नाही दिल्हे।
ऐसें आभाळ कोंसळले। उद्वेगांचें।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView