चार मन-प्रकार - विज्ञान प्रकार

Date: 
रवि, 23 फेब्रु 2014

चार मन-प्रकार - विज्ञान प्रकार
जिवंा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले।
देहबुध्दिचे कर्म खोटें टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना।।137।।

भय, राग, धैर्य, शांती याचे विश्र्लेषण प्रथम श्रीरामदासांनी केले आणि त्याचे विज्ञान एकशेचौतीसनंतरच्या श्र्लोकात समारोप रूपाने पाहिले. श्रीरामदसांचे हे विवेचन इतके ठाशीव, स्पष्ट आणि पुरावाशुध्द आहे की, याबद्दल काडीमात्र संशय नाही. म्हणून या श्र्लोकाच्या पहिल्या ओळीत श्रीरामदास स्पष्टपणाने सांगत आहेत की, ते सांगत असलेली प्रमेये ही समप्रमाण आहेत. त्यांना ज्येष्ठींचा पुरावा आहे. श्रेष्ठींचा आधार आहे.

पुढल्या ओळीत श्रीरामदास सांगतात, जुन्या महाश्रेष्ठींनी सांगितलेले हे विज्ञान ज्यांना समजत नाही, जे लोक विज्ञान लक्षात घेत नाहीत, ते अज्ञानीच राहिले आहेत. पुन्हा समारोपाच्या संधीतच तिसरी ओळ म्हणते की, अशा अज्ञानी माणसांच्या देहबुध्दीचे संरक्षण त्यांना शासन दिल्यावाचून राहणार नाही. कोणत्याही कर्माने गती निर्माण होते, म्हणून एकशे एकोणतिसाव्या श्र्लोकाचा पहिलाच शुरा, ‘गतिकारणे’ हा आहे.
अधिक पुराव्याची आवश्यकता असल्यास, या श्र्लोकातील कर्माचा उल्लेख आणि गति यांच्या एकरूपतेचा पुरावा हवा असल्यास, आपण ‘कर्मगती’ हा शब्द ध्यानात घ्यावा. म्हणजे उरला सुरला संदेह नाहीसा होईल. तिसऱ्या ओळीत श्रीरामदास सांगतात की, देहप्रेमामुळे भय, राग,धैर्य, शांती या चारांची ओळख करून घेतली नाही, तर ‘जुने ठेवणे’म्हणजे ‘जुन्यांनी ठेवलेले ज्ञान’तुम्ही वापरीत नाही, असा त्याचा अर्थ होईल.

शब्द आणि शब्द कसा स्पष्ट आणि रेखीव आहे. आता हे जुने म्हणजे ऋषीमुनी, आणि आधुनिक म्हणजे हिपॉक्रेटेस पॉव्हलॉव्हपर्यंत विज्ञानश्रेष्ठी, हे पुढल्या पाच श्र्लोकांचे निमित्ताने पाहू.

मनोबोधाचे ओवीरूप
काही वैभव मेळविले। पुन्हां सर्वही सांचिले।
परंतु गृह बुडालें। संतना नाही।।
पुत्रसंतान नस्ता दु:खी। वंाज नांव पडिलें लोकिकी।
तें न फिटे म्हणोनी लेंकी। तरी हो आतां।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView