चिंता, सामर्थ्य व घात

Date: 
रवि, 6 नोव्हें 2011

चिंता, सामर्थ्य व घात
मनीं मानव वेर्थ चिंता वाहातें।
अकस्मात होणार होऊन जातें।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगं।
मतीमंद ते खेद मानी वियोगें।।17।।
चिंता आणि प्रयत्न यात फरक आहे.प्रयत्न सोडू नये. चिंता धरू नये. मन नेमके उलटे करते.म्हणून रामदास सुचवीत आहेत की, चिंता वाहू नका. कोणी म्हणतो चिंता केल्याशिवाय हातून प्रयत्न कसा होणार? तेथे सूक्ष्म फरक आहे. परीक्षा नापास होईन आणि माझी बेअब्रू होईल. या भीतीने जो अभ्यास होतो, तेथे चिंता असते. परंतु अभ्यास करण्यामुळे होणारा आनंद मी घेईन, अभ्यासाने माझे ज्ञान वाढणार आहे, आयुष्याचा अर्थ मला कळणार आहे, अभ्यास करणे माझे कर्तव्य आहे, त्यानेच माझे आयुष्य सुखाचे जाणार आहे, अशा भावनेने, अशा जिद्दीने जो अभ्यास होतो, तो प्रयत्न. त्या प्रयत्नात चिंता उणी झालेली असते.

बहुधा सामान्य माणसाच्या प्रयत्नाला चिंतेचे ओझेच अधिक असतं. त्यामुळेच नकळत अडथळा होतो तो प्रयत्नाला. म्हणून रामदास सांगत अहेत की, तुझे कर्तव्य तू करत असताना अडथळा यायचाच असला, तर तो अकस्मात येईल. कोणता अडथळा येण्याची शक्यता आहे, याबद्दल फार तर तू विचार करून ठेव. मग पुन्हा पुन्हा चिंतेची चिता पेटवू नकोस. जो कोणता अडथळा यायचा तो मागल्या कर्माच्या संकुल हिशोबाने येणार. पण या ज्ञानाचाच विवेक नसल्यामुळे मतिमंद माणसाला चिंता चावत राहते.
शेवटल्या दोन ओळींचा भर दैववादाकडे नाही. कर्मसिध्दान्त म्हणजे दैववाद नाहीच. मला जे काय मिळत आहे, ते माझ्या पूर्वकर्माने मिळत आहे. पूर्वी कर्म करण्याचा माझा अधिकार होता; आहे, त्या अनुभवावरून माझ्या कर्मपध्दतीत योग्य तो बदल घडवून आणू शकतो, हे उघड आहे. हा रामदासांचा अभिप्राय आहे. तिसऱ्या श्लोकांतला ‘सदाचार’हा शब्द, सातव्या श्लोकातला ‘धैर्य उपदेश’, आठव्या श्लोकातला ‘चंदनरूप प्रयत्न’. प्रयत्न महात्म्यच सांगतात.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘भाग्यस्वप्न मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7 श्लोक 25ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
कां जे योगमायापडळें। हे जाले आहाती आंधळे।
म्हणोनि प्रकाशाचेनि दिहवळें। न देखती मातें।।158।।

हे जीव प्रकृति मायेच्या झापडीने आंधळे झाले आहेत. म्हणून प्रकाशाच्या उजेडाने ते मला पाहू शकत नाहीत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView