जग हे असे जन्मले

Date: 
रवि, 8 मार्च 2015

देहबुधिचा निश्र्चयो ज्या टळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना।
परब्रह्म तें मीपणें आकळेना।
मनी शून्य अज्ञान हें मावळेना।।191।।

‘सायन्स अँड फिलॉसॉफी’ परिशिष्टात वीस बी व सी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नासदीय सूक्त हे प्राचीन सूक्त सांगते की मनाचे रेत पूर्व शांती ब्रह्मापासून अलग झाले, तेव्हा जगाचा जन्म झाला.

अर्थात् आजच्या स्थितीतल्या मूळ जगाचा ‘वीस सी’ या मुद्यात नासदीय सूक्ताचा उतारा आहे. तेथे म्हटले आहे, “ज्यामध्ये सर्व वस्तूजात राहते व विसावा घेते, त्या प्रचंड विश्र्वचक्रात आत्मा हा जोपर्यंत आपण विश्र्वचालकापासून वेगळे आहो असे मानतो, तोपर्यंत फडफडत भ्रमण करतो. पण त्यावर ईश्र्वराची कृपा होते, तेव्हा त्याला अमरत्वाचा लाभ होतो. वेदात उच्चतम अशा ब्रह्माचे स्वरूप वर्णिलेले आहे, हे त्रिगुणात्मक असणे तेच आधारभूत व अविनाशी असते. ज्यांना ब्रह्मज्ञान होते, त्यात काय आहे हे समजते, ते त्याची भक्ति करतात व जन्ममरणातून मुक्त होऊन त्याच्याशी एकरूप होतात. विनाशी आणि अविनाशी, व्यक्त आणि अव्यक्त या सर्वांना ईश्र्वर जाणतो तेव्हा तो सर्व बंधनातून मुक्त होतो. हे ज्ञान करून घेण्याची जबाबदारी योगी माणसावरच आहे.”

हे देहभोग टाळण्याचा निश्र्चय पहिली ओळ सांगते. अशा अनिश्र्चयी माणसांना खरे ज्ञान कल्पांतकाळी होणार नाही, असे दुसरी ओळ सांगते. त्यामुळे परब्रह्म कळणार नाही आणि मनातले अज्ञानपूर्ण शून्य जाणार नाही असे उरलेला श्र्लोक सांगतो.

मनोबोधाचे ओवीरूप
तांतडी तांतडी जेऊं घाली। तों ते जेवितां जेवितां कांही मेली।
कांही होती धादावली। तेंहि मेली अजीर्णे।।
ऐसी बहुतेकें मेली। येक दोनी मुलें उरलीं।
तेंहि दैन्यवाणी जाली। आपले मातेवंाचुनि।।
ऐंसें अवर्षण आलें। तेणें घरचि बुडालें।
पुढी देसी सुभिक्ष जालें। अतिशयेंसी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView