जे नसते ते नाते

Date: 
रवि, 27 नोव्हें 2011

जे नसते ते नाते
बहू हिंपुटी होईजे मायेपोटीं।
नको रे मना यातना तेचि मोठी।
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी।।20।।
मागल्या श्लोकात ‘खरे धर, खोटे टाक,’ एवढे मनाला सांगितले. पण खोटे म्हणजे काय? तर सर्वात खोटी माया. मनुष्य आपल्या नातेसंबंधितांच्यासाठी फार कष्टी होतो. भाषा तरी कशी आहे पहा. अशा संबंधिताचे आपण वर्णन करतो. “ना ते” म्हणजे ज्याचे अस्तित्वच नसते ते. मग श्रीरामदास मुळालाच हात घालतात. माणसाचा जन्म होतो, त्याच्या इच्छेने होतो. त्या जन्माच्या इच्छेत सुरूवातीलाच त्याला नऊ महिने उलटे टांगून बसावे लागते. वामनपंडितांनी जन्मपूर्व अवस्थेचे वर्णन लिहिले आहे - “ जसा भाडियाचा तटू स्वर्ग तैसा तयाचा अहो! मानिती लाभ कैसा? सरे पुण्य लोटूनिया देति जेव्हा। रडे फुदफुंदो पडे मूळ तेव्हा।।” पुढील साक्ष ज्ञानेश्र्वर महाराजांची आहे. मनुष्य जन्माला येताना ज्या जागेत असे उलटे रहावे लागते, त्याच्या बाजूला रक्त, आतडी, विष्ठा, मूत्र थबथबून असतात. म्हणजे श्रीरामदास मनाला या दु:खाची रास्त जाणीव करून देत आहेत.
सूक्ष्म विचार केला, तर ही दु:खे समजतील. खोटी दु:खे, खोटी माया ही दूर होतील. याचा अर्थ जुलमाने, इच्छा सोडावी असा नसून, ज्ञानपूर्वक व्यवहार करावा असा त्याचा अर्थ आहे.

मनाचे ‘अभंग’रूप
रिकामें तू नको मना। राहों क्षणाक्षणा ही।।1।।धृ.।।
वेळवेळा पारायण। नारायण हें करी।।2।।
भ्रमणांच्या मोडी वाटा। न भरे फाटा आडराने।।3।।
तुका म्हणे माझ्या जीवें। हें चि घ्यावे धणीवरी।।4।।
- तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView