तसा वेळ असतो कोणाला

Date: 
रवि, 25 डिसें 2011

रघूनायकावीण वायां सिणावें।
जनासारिखे वेर्थ कां वोसणावेें।
सदा सर्वदा नाम वाचे वसों दे।
अहंता मनीं पापिणी ते नसों दे।।24।।
एक रामभक्त भगिनी काही अडचण निवारण्यासाठी भेटल्या. मी त्यांना सांगितले की, रोज तासभर विशिष्ट पध्दतीने रामध्यान करा, अडचण दूर होईल. त्या म्हणाल्या “या धकाधकीच्या दिवसात रोज एक तास कोठून मिळणार? आणि एक तास म्हणजे कंटाळा येईल. “ मग मी पाऊण तास सुचवला. पाहिले तर चेहऱ्यावर एक दोन आठ्या जास्तच दिसल्या. अर्ध्या तासावर, पंधरा मिनिटांवर आणि अखेर पाच मिनिटांवर गाडी खाली आणली, तेव्हा त्या म्हणाल्या, “तेवढे बहुधा जमेल. “ आता ‘बहुधा’ शब्दावर मी अडलो आणि तीन मिनिटे तरी रोज साधना सुचवली.
“आता मात्र फारशी अडचण येणार नाही. “ त्या म्हणाल्या. मी म्हणालो, “फारशी अडचण नाही म्हणजेच थोडीशी येईलच. ठीक आहे. आता असे ठरले की, तुमची रोज तीन मिनिटे तुम्हाला आदरणीय वाटणाऱ्या रामासाठी आणि उरलेले तेवीस तास सत्तावन्न मिनिटे रावणासाठी. “
त्या भगिनींच्या तोंडावर प्रथम राग आणि चकितपणाचा आविर्भाव यांचे मिश्रण दिसले. कळूहळू त्या बोलण्याचा अर्थ समजल्या. श्रेष्ठ अधिकारी प्रतीकावर एकाग्रतेसाठी वेळ देण्याचा कंटाळा येतो, शीण येतो. यावर श्लोकपंक्तीच्या चतुष्ट्यात श्री रामदासांनी बरोबर आक्षेप घेतला आहे. ते मनाला बजावतात, ‘रामाच्या नावाशिवाय इतरत्र भटकायचाच तुला कंटाळा यायला पाहिजे. उगीच नसत्या लोकांच्या नादाला लागून इतर गोष्टी बरळत बसू नकोस. जे जे करशील त्यामागे रामस्मरण उभे असले, म्हणजे पापाचा संभव तेवढा कमी होईल. (वोसणावे म्हजे बरळावे)
मनाचे ‘अभंग’रूप
नको नको मना गुंतू मायाजळी।
काळ आला जवळी ग्रासावया।।1।।धृ।।
काळाची हे उडी पडेल जेव्हा। सोडविना तेव्हा मायबाप।।2।।
सोडवीना राजा देशाचा चौधरी। आणीक सोइरीं भली भली।।3।।
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी। एक चक्रपाणी वाचूनियां।।4।।
- तुकाराम.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView