तीन कोडी - देह, मन, आत्मा

Date: 
रवि, 29 मार्च 2015

वसे हृदयी देव तो कोण कैसा।
पुसे आदरें साधकु प्रेष्ण ऐसा।
देहे टाकिता देव कोठें रहातो।
परी मागुता ठाव कोठें पहातो।।194।।

शंातीचा आदर्श म्हणून, राम हा स्वत:च आयुष्यात दु:खी असलेला देव कसा उपयोगी पडेल, अशी जिज्ञासूला शंका येते. याचे उत्तर सोपे आहे. देहात आल्यावर दु:ख आणि संकट ही सत्य-सहजता आहे. रामाचे वैशिष्ट्य असे की पराकाष्ठेच्या दु:खात किंवा संकटात त्याने परोपकार, धैर्य, शांती सोडली नाही. अशांतीतल्या शांतीचा हा अपूर्व आदर्श यामुळेच, माणसाला उपयोगी पडेल.
ही सुप्त प्रश्र्नोत्तरे हा श्र्लोक लिहिताना श्रीरामदासांना गृहीत असली पाहिजेत; म्हणून या श्र्लोकातला पृच्छक अत्यंत आदराने पहिल्या दोन ओळीत प्रश्र्न विचारीत आहे की, हा असा हृदयात बसणारा देव कसा आहे? त्याची अधिक माहिती तरी सांगा. तो देह सोडल्यानंतर कोठे जातो? नंतर कोठे राहतो?
या प्रश्र्नाचे उत्तर पुढील श्र्लोकात दिले आहे. मात्र तो श्र्लोक समजण्यासाठी ज्यामुळे व्यक्ती निर्माण होते, त्या तीन वस्तू समजावून घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे देह, मन आणि आत्मा; या तिन्हीची चर्चा ‘विज्ञान परिभाषेत गीता’ प्रबंध तीनमध्ये केली आहे. त्याचे सूत्ररूप आणि त्यातून निघणारा निष्कर्ष पुढील श्र्लोकात कळेल.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘धान्यसमृध्दी’मंत्र या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 18ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
मीचि एक अनेकपणें। वेगळालेनि प्रकृतिगुणे।
जीत जगाचेनि प्राणे। वर्तत असे।।289।।
अर्थ: मीच अनेकत्व धारण करून प्रकृतीच्या भिन्न भिन्न गुणांच्या द्वारे जित्या जगाच्या प्राणरूपाने कर्म करीत असतो.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView