दुःख कसे सोसावे?

Date: 
रवि, 18 सप्टें 2011

दु:ख कसे सोसावे?
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवीं करावी।।
देहेदु:ख हें सूख मानीत जावें।
विवेकें सदा सस्वरूपीं भरावे।।10।।

व्यवहारात राम शब्दाचा उपयोग मोठा चमत्कारिक होऊन बसला आहे. एखाद्याने ’ राम’ म्हटला हे ऐकल्यावर त्याचा शेवट झाला असा अर्थ करणार. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की, राम शब्दाचा उच्चार जन्मभर करण्याचे कष्ट कोणी घेत नाही. त्याची गाठ एकदम अजामिळाप्रमाणे अखेरीला पडायची. उत्तर प्रदेशात तर स्मशानाकडे जाताना ’ राम बोलो भाई राम’ असे म्हणायचे असते. पण त्यात हृदयाची भक्ती किती आणि रूढीची सक्ती किती, हे ज्याचे त्यालाच माहीत.

महाराष्ट्रात, विशेषत: खेडेगावात भेटल्यानंतर ’ राम राम’ चा उपचार होतो. पण मराठीच एखादी किळसवाणी गोष्ट समोर आली की, तोंड वाईट करून ’ राम राम’ म्हणतात.
या वरवरया उपचारातून हृदयाच्या उद्‌गारापर्यंत पोचायचे असेल, तर राम हा मनापासून सदासर्वदा उच्चारला पाहिजे. दहाव्या श्लोकात पहिली ओळ ते सांगते. व्यवहार इतका रामरूप झाला पाहिजे की, त्यापुढे द:खाची आठवण होऊ नये.एक फकीराच्या पायात बाण घुसल्याची गोष्ट विनोबाजींनी संागितली. ते दु:ख इतके अपार होते की, फकीर पायातला बाण काढण्यासाठी कोणाला तेथे हात लावू देईना. अखेर कोणीतरी सांगितले की, तो फकीर नमाज पढायला लागला की, बाण उपसून घ्या. त्यावेळी त्या फकीराला दु:खाची आठवणही होणार नाही.
शांतीची इतकी एकरूपता साधली, की, देहाचे दु:ख म्हणजेच सुख ही सहजावस्था येऊन बसते आणि त्यामुळेच विवेकपूर्ण आत्मरूप दर्शन होते, असा तिसऱ्या चौथ्या ओळीचा भावार्थ आहे.

मनाचे ’ अभंग’ रूप
आधिका कोंडितं चरफडी। भलतीकडे घातली उडी।।धृ।।
काय करूं या मना आतां। की विसरतें पंढरीनाथा।।1।।
करी संसाराची चिंता। वेळोवेळी मागुती।।2।।
भजन नावडे श्रवणा।धावे विषय अवलोकना।।3।।
बहुत चंचळ चपळ। जाता येता न लगे वेळ।।4।।
किती राखो दोनी काळ। निजलिया लागे वेळ।।5।।
मज राखे आता। तुका म्हणे पंढरीनाथ।।6।।।
-तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView