दु:ख ‘नियमानेच ‘जाईल.

Date: 
रवि, 7 जून 2015

मना संग हा सर्व संगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी।
मना संग हा साधका शीघ्र सोडी।
मन संग हा द्वैत नि:शेष मोडी।।204।।

मागल्या श्र्लोकात महादु:ख हे संकटराशीला तोंड दिल्याने कसे नाहीसे होते, याचे विवचेन आहे. म्हणून पुन्हा हा श्र्लोक, मागल्या श्र्लोकातील पहिल्या ओळीची पुनरुक्ती व उपदेश करतो आहे की, इतर सहवास सोडून दिले आणि सज्जन सहवास जोडला, तर साधकाला सगळ्या चिंतेतून मुक्तता मिळते.
मन संतत संकटात किंवा दु:खात असले तर त्यातून मुक्ती कशी मिळणार? एका ज्योतिषाची गोष्ट आहे. त्याने आपल्या गिऱ्हाईकाला आशेने विचारले,

‘चाळीस वर्षापर्यंत दु:ख आहे. ‘ मग गिऱ्हाईकाने आशेने विचारले की, ‘चाळीस वर्षानंतर काय होईल? ‘ तेव्हा ज्योतिषी म्हणाला, ‘त्यानंतर तुला दु:खाची सवय होईल आणि दु:ख वाटणार नाही. ‘ त्यातला अतिरेक सोडला तर मानसशास्त्रीय दृष्टीने हा विचार पटण्याजोगा मुद्दा आहे. लढाई टाळण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे लढाईला तयार राहाणे, त्यासाठी कष्ट घेणे, तसेच हे आहे.
‘टेक्स्ट बुक ऑफ फिजिऑलॉजी ‘(संदर्भ ग्रंथ तेवीस टी) पान सहाशे वीसवर ‘लॉ ऑफ फोर्स ‘चे वर्णन आहे. ज्या स्थितीत मनाला ठेवावे त्याच्या एका बिंदूपलीकडे मन बरोबर उलटी स्थिती करून घेते, असा संदर्भ आहे. जास्तीत जास्त दु:ख सहन करण्याचे प्रयोग झाले. ते डॉ.व्हार्डी व डॉ.वोल्फ यांनी केले. (पान 40 ‘नवविज्ञानाच्या परिसरात ‘लेखक डॉ.कर्वे, संदर्भ 240टी) ते सहन करता येतात. म्हणजेच तेथे दु:खपण संपते. परस्पर विरोधाचा नियम सर्व जगभर भरून राहिला आहे. त्याची उदाहरणे आपण दिली आहेत. प्रत्येक सुख हे बंधन निर्माण करीत असते. त्यातून निश्र्चयाने सुटका, ही केवळ मनाच्या शक्तीनेच शक्य आहे.

मनाोबोधाचे ओवीरूप
मजही वृद्राप्य आलें। लेकी वेगळें घातलें।
अहा देवा वोढवलें। अदृष्ट माझें।।
द्रव्य नाही कांती नाही।ठाव नाही शक्ति नाही।
देवा मज कोणीच नाही। तुजवेगळें।।
पूर्वी देव नाही पुजिला। वैभव देखोन भुलला।
सेखीं प्राणी प्रस्तावला। वृध्धपणी।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView