दुर्गुणात वाईट काय?

Date: 
रवि, 17 ऑगस्ट 2014

अहंतागुणे नीती सांडी विवेकी।
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकी।
परी अंतरी सर्व ही साक्ष येते।
प्रमाणांतरे बुध्दि सांडूनि जाते।।162।।

जगामध्ये दुर्गुणी माणसांचे जय पुष्कळदा पाहावयास मिळतात. त्यामुळे सामान्य मनुष्य ‘दुर्जनं प्रथमं वंदे’म्हणजे दुर्जनाला घाबरून असतो. आढ्यतेखोर, आपल्याच धुंदीत असणारी माणसे, सुखात लोळत असेलेली पाहिली की सामान्य माणासाची चलबिचल होते , यात काही नवल नाही. मग काही चांगल्या प्रेरणा असलेली माणसेसुध्दा हताश होऊन विचार करू लागतात की वाईट माणसाची भरभराट झालेली डोळ्यापुढे दिसते, तर चांगले वागण्याचा हट्ट आपण का धरावा? चांगले होण्याचा उपयोग तरी काय?

याला उत्तर सोपे आहे. पुष्कळवेळा दुर्गुणामुळे ताबडतोब सुखाचे फळ मिळते हे खरे. पण कालांतराने त्यंंाची अपकीर्ती होते. उलट गुणाने माणसे ताबडतोब बदनाम झालेली दिसली तरी, कालांतराने यांची कीर्ती पसरत जाते. राम-कृष्ण, ख्रिस्त, महंमद, नानक, बुध्द, ज्ञानेश्र्वर, तुकाराम यांच्यासारख्यानंा जिवंतपणी कष्ट चुकले नाहीत. पण नंतरची कीर्तीही चुकली नाही. उलट तैमूरलंग, स्टॅलिन, हिटलर, मुसोलिनी यांच्यासारख्यांचे पुतळे इतर देशातच राहो पण त्यांच्या देशातही उभारले गेले नाहीत. औरंगजेब इस्लामातही मोठा आदरणीय पुरुष मानला जातो असे नाही. त्या बिचाऱ्या बादशहाचे अखेरचे उद्गार तर केविलवाणे आहेत. कळवळून त्याने म्हटले आहे की, माझ्या पापाबद्दल अपार यातना मला भोगाव्या लागणार आहेत. श्रीरामदास असा सारांश सांगून म्हणतात की, अहंकारी माणसाचे मन नीती सोडते. तात्कालिक मान्यता जोडते. पण त्याला मनातल्या मनात आपले पाप माहीत असते.

ज्ञानेश्र्वरी मानस
(‘चिंतामुक्ती मंत्र’या साधनेसाठी, अध्याय 9 श्र्लोक 9ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तो जैसा का साक्षीभूतु। गृहव्यापार प्रवृत्तिहेतु।
तैसा भूतकर्मी अनासक्तु। मी भूती असे।।129।।
अर्थ: दिवा जसा केवळ तटस्थ असतो, तरी पण घरातील माणसाच्या क्रियांस कारण होतो; तसाच मी भूतमात्रात असूनही भूतमात्रंाच्या कर्माशी माझा संबंध नाही.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView