दुर्योधनाचे उत्तर

Date: 
रवि, 31 मार्च 2013

न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी।
हरीनाम हें वेदशास्त्र पुराणीं।
बहू आगळें बोलिला व्यासवाणी।।90।।

दुर्योधनाला विचारले की तू असा दुष्टपणाने का वागतोस? तर त्याचे उत्तर मोठे मानसशास्त्रीय सत्य आहे. त्याने उत्तर दिे की, वाईट काय हे मला समजते, पण ते मला सोडवत नाही. चांगले काय ते मला समजते, पण ते मला धरवत नाही. दुर्योधनासारख्या स्वभावाच्या पाप्यांनी हरिचिंतनाची थोडी जरी सवय लावली, तरी त्यंाना सत्यस्पर्श होईल. दुर्योधनासारखे जे दुर्दैवी प्राणी आहेत, त्यांच्या तोंडात रामनाम वसतच नाही, म्हणून दैव त्यांच्या तोंडात मारते.
या श्र्लोकाची पहिली ओळ सांगते की, देवनाम सहजतेने न घेणारे जे कोणी असतील, त्यांची हानी होते. ज्यांना देवाचे नाम काणेपणाने म्हणजे वाकड्या नजरेने, तुच्छतेने पहावयाचे आहे, त्यांचे जिणे व्यर्थ आहे.
तिसरी आणि चौथी ओळ सांगते की, हरिनामाला फार जुना आधार आहे. या दोन ओळींचा अन्वय लावताना, काही भाष्यकार वेद हा व्यासाने लिहिला नाही, इत्यादि शंका काढून निराळा अन्वय देतात. पण या ऐवजी साकल्याने तिसराच न्याय्य अन्वय लावता येईल. “हरिनामाचे सामर्थ्य, म्हणजे एकूण नामाचे सामर्थ्य, वेद आणि अन्य शास्त्राइतके पुराणे आहे, याबद्दल श्रीव्यास महर्षींचे खास विवेचन आहे. आग्रह आहे, हा अन्यवार्थ अधिक बरा. आता व्यास महर्षींचा आग्रह काय विचाराल, तर अठरा पुराणे लिहून झाल्यावर त्यांनी सांगितले की परसहाय्य म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप. नुसते हरिनाम व्यर्थ, रामाचे ‘काम’ सार्थ, असे पूर्वीचे अनेक श्र्लोक सांगतात. तेव्हा नामाला कामाची जोड देण्याचा व्यासांचा आग्रह, आगळाच आणि योग्य म्हणावा लागेल.

मनोबोधाचे ओवीरूप
नाना व्याधीचे उमाळे।। तेणे दु:ख आंदोळे।
रडे पडे कां पोळे। अग्निसंगे।।
शरीर रक्षिता नये। घडती नाना अपाये।
खोडी अधांतरी होये। आवेवहीन बाळक।।
अथवा अपाय चुकले। पूर्व पुण्य पुढें ठाकलें।
मातेस वोळखों लागलें। दिवसेंदिवस।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView