देव केव्हा शोधावा?

Date: 
रवि, 9 नोव्हें 2014

जया चक्षुने लक्षितां लक्षवेना।
भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना।
क्षयातीत ता आक्षै मोक्ष देतो।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो।।174।।

मनाचा आणि देहाचा संबंध स्पष्ट करून झाल्यावर श्रीरामदास एकशे चौऱ्याहत्तरपासूनच्या श्र्लोकात देवाचे स्वरूप सांगत आहेत. देवाला चक्षुने पाहता येत नाही, असे पहिल्या ओळीत नमूद केले आहे. एकशे एकोणपन्नासाव्या श्र्लोकात पहिल्या ओळीत तोच भावार्थ आहे.
दुसरी ओळ म्हणते की, या भवाचे भक्षण म्हणजे संसारनाश झाल्यानंतर त्या देवाचे रक्षण करू म्हटले, तर तसे शक्य होत नाही.

तिसरी ओळ सांगते की असा देव अक्षय मुक्ती देतो.
चौथी ओळ सांगते की दयादक्ष असा देव साक्षित्वाने मदत करतो. यापैकी दुसऱ्या ओळीचा अर्थ काहीजण असा करतात की ‘देवाला कोणी ज्ञानचक्षूने पाहू म्हटले तरी तो पाहिला जात नाही. ‘ पण यापेक्षा वर दिलेला अर्थ अधिक बरा आहे.

वास्तविक, दुसऱ्या ओळीत खरा अर्थ याहीपेक्षा सूक्ष्म करावयास हवा. तो असा की संसाराचा नाश झाल्यावर म्हणजे ‘करून सावरून भागल्यावर’देवाकडे वळू असा कोणी विचार केला तर तो चुकीचा आहे. देव आणि संसार यांचे इतके पूर्ण विभाजन करून चालणार नाही. प्रपंच आणि परमेश्र्वर साथीनेच साधले पाहिजे, असे सर्व संतांच्या आणि ज्ञात्यांच्या उपदेशाचे मर्म असते. पाप पूर्ण करून झाल्यानंतर पुण्याकडे वळू, ही आशा व्यर्थ असते. दुबळ्या माणसाच्या हाताने पाप कधी पुरे होत नाही, आणि पुण्य कधी सुरू होत नाही. तेव्हा दक्ष मनुष्य डोळ्याने देव दिसत नाही, अशी सबब न करता देव मानतो. त्याला आवडेल असे कर्म करतेा आणि हे साक्षीदार होऊन म्हणजे स्वत:च्या अक्षाने निश्र्चित करून मग देव दया करतो.

मनोबोधाचे ओवीरूप
आपुला गांव राहिला मागें। चित्त भ्रमलें संसार उद्वेगें।
दु:खवला प्रपंचसंगे। अभिमानास्तव।
ते समई आठवली। म्हणे धन्य धन्य तें माउली।
मजकारणें बहुत कष्टली। परी मी नेणेचि मूर्ख।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView