देह दिला, नाव राखले

Date: 
रवि, 5 जाने 2014

चीनमध्ये तेवीस ते एकोणीसशे पंचवीस मध्ये भयानक धरणीकंप झाला. त्या धरणीकंपाची हकीगत तेरा ऑगस्टच्या ‘अमेरिका’या वृत्तपत्राने प्रसिध्द केली. धरणीकंपामध्ये एका धर्मसेवागृहाची इमारतही सापडली. कोसळलेल्या त्या इमारतीखाली एक स्त्री ओणव्या अवस्थेतच मेलेली होती. तिच्या वाकलेल्या अवस्थेत तिच्या शरीराखाली दोन मुले सुखरूप होती. तिने त्या मुलांच्या रक्षणासाठी आपला देह गमावला होता. म्हणून तुम्ही आम्ही आजही ही नोंद घेत आहोत. मरण हे शेवटी टळत नसते. टळते ते सत्कृत्य करून जाण्याचे. राहते ते सत्कृत्य. सत्कृत्याने आयुष्य खरोखरी सार्थ होते, सफल होते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView