दोन जंतूंचा संहार

Date: 
रवि, 23 ऑक्टो 2011

दोन जंतूंचा संहार
मना पाहतां सत्य हे मृत्यूभूमी
जितां बोलती सर्वही जीव मी मी।।
चिरंजीव हे सर्वही मानिताती
अकस्मात सांडूनियां सर्व जाती।।15।।

“हा शब्द शंकररावांचा आहे, हे लक्षात ठेवा! उद्या माझ्या मोटारने मी तुमच्याकडे येणार, तेथे जेवणार. या माझ्या निश्चयात कसलाही फरक होणार नाही. “
शंकररावांचे मित्र हे आश्वासन ऐकून संतुष्ट झाले. शंकरराव बडे अधिकारी होते आणि त्यांच्याकडून त्यांच्या स्नेह्यांना काही काम करून घ्यायचे होते पण गोष्ट अशी होती की, शंकररावांनाही या स्नह्याकडून काही लाभ होता आणि म्हणूनचे त्यांनी हे निग्रहाचे आश्वासन दिले होते.
शंकररावंाच्या पोटात दोन टॉयफॉईडचे जीवाणू हसत खिदळत यावेळी बसले होते. थोड्या वेळापूर्वीच, शंकररावांनी प्यालेल्या पाण्यातून ते शंकररावंाच्या पोटात उतरले होते. शंकररावांची ही बढाई ऐकून, नंतर पोटात गेलेल्या त्या दोघांपैकी एक टॉयफॉईडचा जंतू पोट धरूनधरून हसला. म्हणाला, “या मूर्खाचे कसले हे मत, आणि वचन? दोन तासांत हा आता आडवा होणार आहे. तो पाच-पंचवीस दिवस काही अंथरूणाबाहेर पडणार नाही. “
शंकररावंाचे मन आणि मत खोटे ठरले. जीवाणूंचे खरे ठरले. ‘मी मी’ म्हणत मनुष्य ज्या कल्पना करतो, त्याचे त्याच्या शरीरावरही पुरते नियंत्रण नसते. रामदासा पंधराव्या श्लोकात या ‘मी’पणावर बोट ठेवून सांगतात की
तुमचे कर्तृत्व, अहंकार, माया या सर्वांपेक्षा ‘मत्यू’ हे अधिक सत्य आहे. हे न जाणता, येतो तो मनुष्य आपला आपल्या मुलाला ‘चिरंजीव’म्हणून संबोधित राहतो. आपण आणि आपले आवडते सगळेच चिरंजीव राहणार आहोत, या ‘मी’पणात हा मनुष्य सर्व जन्म घालवतो.

मनाचे अभंगरूप
अधीरा माझ्या मना ऐकें एकी मात। तू का रे दुश्चित निरंतर।।1।। ।।धृ।।
हे चि चिंता काय खावें म्हणउनि। भले तुजहूनि पक्षिराज।।2।।
पहा ते चातक ने घे भूमिजळा। वरुणे उन्हाळा मेघ तया।।3।।
सकळ यातींमध्ये ठक हा सोनार। त्या घरी व्यापार झारियाचा।।4।।
तुका म्हणे जळीं वनी जीव एक। तयापाशीं लेख काय असे।।5।।
- तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView