दोषाचे सामर्थ्य

Date: 
रवि, 24 मार्च 2013

जनीं भोजनीं नाम वाचे वदावें।
अती आदरें गद्द घोषें म्हणावें।
हरीचिंतनें अन्न जेवीत जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।।89।।
श्र्लोकाच्या दोन ओळी सामुदायिक साधना सांगतात आणि पुढच्या दोन ओळी वैयक्तिक साधना सांगतात. जनात आणि भोजनाच्या वेळी रामनाम घ्यावे असा या ओळीचा एक अर्थ होता खरा, पण दुसरा अर्थ सार्वजनिक भोजनात रामनाम घ्यावे असाही होतो. तो अर्थ दुसऱ्या ओळक्षतील ‘घोष’या शब्दाने अधिक सार्थ होईल. सामुदायिक उच्चारण होते तेथे ‘घोष’ हा शब्द अधिक सार्थकतेने लागतो. अनेजण वेदपठण करत असतील, तेव्हा वेदघोष होतो, असे आपण म्हणतो. म्हणून सार्वजनिक भोजनपंक्तीमध्ये हा रामघोष व्हावा , असा रामदासांचा अभिप्राय असावा. अर्थात नुसता प्रकट घोष किंवा बाहेरचा घोष, ही एक जोडसूचना आहे. मुळात वैयक्तिक चिंतन अभिप्रेत आहे.

आणि तेच तिसऱ्या ओळीत निराळे करून, आवर्जून सांगितले आहे की, अन्न घेत असतानाही हरी चिंतन व्हावयास हवे. येथे घोषाव्यतिरिक्त चिंतन महत्त्वाचे सांगितलेले आहे, कारण देव काही मोठमोठ्या गर्जनांनी येणार नाही. तर शांत सूक्ष्म चिंतनावस्थेत तुमच्या आत पोचल्यासच देव पावेल अशी चौथी ओळ सांगते. मूळ सूक्ष्म चिंतनाने पावणे, हा देवाचा सहज स्वभाव आहे.
आता येथ अन्नाचाच संदर्भ दिला आहे, कारण शेवटी माणसाचा देह अन्नमय आहे. मनातले रामनाम अन्नाशीही समरस झाले की, मनुष्य देहात आणि मनात अगदी अंतरबाह्य राममय होईल. मनुष्य अन्नावर जगतो. म्हणजे बहुतेक जीवनात वनस्पतीच्या पेशीतील शक्तीच माणसाचा देह घडवीत असते. त्या पेशी पुन्हा रामनामाने तेजोमय करण्यासाठी मनात चिंतन आणि जनात रामघोष या साधना वैयक्तिक शक्ती देतील. सामुदायिक शक्तीची एक नवी शिडी येथे मिळेल. (घोषणाबद्दल सूक्ष्म विवेचन 91-92मध्ये)

मनोबोधाचे ओवीरूप
देहास कांही दु:ख जालें। अथवा क्षुधेने पीडलें।
तरी तें परम आक्रंदले। परी अंतर नेणवे।
माता कुरवाळा वरी। परी जे पीडा जाली अंतरी।
ते मायेसी नकळे अभ्यांतरी। दु:ख होये बाळकासी।।
मागुतें मागुतें फुंजे रडे। माता बुझाली घेऊन कडे।
वेथा नेणती बापुडे। तळमळी जीवीं।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView