Home » Weekly Hymn » निंदानाश मंत्र
निंदानाश मंत्र
Date:
रवि, 12 जाने 2014
जयंतीलाल आणि रसिकलाल हे दोन व्यापारी एकमेकात बोलत होते. त्यातला एक कंजुष होता आणि एक उदार होता. कंजुष व्यापाऱ्याला लोक नावे ठेवीत होत, ते त्याला सहन होत नव्हते. तो आपल्या मित्राला विचारी, “रसिकभाई, तू निंदा कशी टाळतोस? “ रसिकभाई नेहमी उत्तर देत, “जयंतीलाल, निंदा टाळणे सोपे आहे. निंदा उलटी कर. “याचा अर्थ जयंतीलालला समजत नसे. एकदा त्याने जोर करून याचा अर्थ विचारला. रसिकभाई हसून म्हणाले, “अरे! निंदा हा शब्द उलटा केला म्हणजे काय होईल? “जयंतीलाल डोके खाजवीत म्हणला, “दानी”
रसिकभाई ताबडतोब त्याचा हात पकडून म्हणाले की, “दू दानी हो, दान कर. लोक नेहमी उलटे बोलतात ना? तर आपण दानी व्हावे. म्हणजे निंदा उलटी होते. “ रसिकभाईचया लोकप्रियतेचे रहस्य जयंतीलालच्या ध्यानात आले होते. हळूहळू तो सुधारला, दानी झाला आणि लोकांना प्रिय झाला.