ब्रह्म, कुत्रा, नदी

Date: 
रवि, 18 जाने 2015

नव्हे ते चि जालें नसे ते चि आले।
कळोलागले सज्जनाचेनि बोले।
अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावें।
मना संत आनंत शोधीत जावे।।184।।

या पार्श्र्वभूमीवर, या श्र्लोकात म्हटले आहे की मूळ स्वरूपात हे जग नव्हते, तेथे निर्माण झाले. या पहिल्या ओळीचा दुसरा अर्थ असा की, जे झाले नाही आणि जे आलेही नाही, ते जग (दुसऱ्या ओळीत म्हटल्याप्रमाणे) सज्जनांच्या तोंडून कळू शकते. म्हणून तिसरी ओळ कबूल करते की, शब्दात सापडण्याजोगे नाही ते ब्रह्म, ते संतांच्या तपाने प्रकट होते. म्हणून संतांचा मागोवा घेत राहावा, असे चौथी ओळ सांगते. एकशे एकोणसत्तराव्या श्र्लोकाची पहिली ओळ “अनंत संता पुसावा “ म्हणते. येथे मात्र “संत आनंत शोधीत जावे “ म्हटले आहे. म्हणजे गुरू हा एकच असावा, असा श्रीसमर्थांचा आग्रह नाही. दत्ताने चोवीस गुरू केले.

याचा अर्थ सत् मिळेल तेथे शोधत जाण्याचे, ते प्रतीक आहे. नदीचा प्रवाही त्याग, डोंगराची शंाती व अचलता, कुत्र्यांची निष्ठा, हे सगळे गुरूरूप होऊ शकतात. जसे दत्ताचे झाले.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसा हा देह आपुला। असतांच पराधेन केला।
ईश्र्वरी कानकोंडा जाला। कुटुंकावाडी।।
या येका कामासाठी। जन्म गेला आटाटी।
वय वेाशया सेवटी। येकलेंचि जावें।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView