ब्रेन वॉशिंगची किमया

Date: 
रवि, 28 जुलै 2013

मना कोपआरोपणा ते नसावी।
मना बुध्दि हे साधुसंगी वसावी।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी।
मना होई रे मोक्षभागी विभागी।।107।।
गेल्या श्र्लोकात मनाला शिस्त लावण्याची साधना सांगितली आहे. या साधनेतून मिळालेली शंाती टिकवावी कशी, हे हा श्र्लोक सांगतो. देवपूजेच्या काळात नाक धरून, डोळे बंद केले आणि पूजा संपल्यावर मात्र रागाचे थैमान घालणारा व्यवहार केला, तर पूजेची शंाती वाया गेली. म्हणून या श्र्लोकाची पहिली ओळ व्यवहारात राग धरू नये, हे सांगते.

कोप-आरोपणा म्हणजे मनात रागाचे आरोपण. वृक्ष आरोपण म्हणजे झाड लावणे. झाडाची निर्मिती सुरू होणे. झाडाची निर्मिती हवी. रागाची निर्मिती मात्र नको. राग नको, असे या श्र्लोकाची पहिली ओळ सांगते.
मनोभूमीमध्ये सहा विकारांच्या बिया असतात. त्यापैकी कोणती बी फुलवावी, बुध्दीने ठरवायचे असेल, तर तिला संतांची संगत उपयोगी पडेल. चांडाळाची किंवा दुष्ट बुध्दीची संगत उपयोगी पडणार नाही, असे या श्र्लोकाची दुसरी व तिसरी ओळ सांगते. आणि शेवटची ओळ सांगते की, दुर्जनाला टाळणे आणि सज्जनांना धरणे हे जमले, तर बुध्दी मोक्ष मार्गाकडे वळेल. येथे पुन्हा लक्षात ठेवले पाहिजे की, मोक्ष म्हणजे मुक्ती आणि मुक्ती म्हणजे भयापासून मुक्ती. आता सज्जनांच्या संगतीत भयापासून मुक्ती का मिळते असा प्रश्र्न पडेल. सज्जनांच्या जवळ भयबुध्दीचे ब्रेन वॉशिंग होते. ही प्रक्रियासुध्दा मानसिक आहे, आणि यावर पुढला श्र्लोक प्रकाश टाकतो. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ब्रेन वॉशिंग म्हणजे मेंदूतील चुकीचे संस्कार धुवून टाकण्यासाठी उपयोगात आणलेली मानसिक प्रक्रिया. आधुनिक मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की, जी गोष्ट, जे वातावरण, ज्या संज्ञा, जे संस्कार तुमच्या सभोवती फिरत राहतील, त्याप्रमाणे तुमच्या मनात बदल होतो. आणि मनात बदल झाल्यावर शरीरात बदल होतो, हे आपण पाहिलेच आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
दाऊनिया चित्त सर्व। हिरोन घेतलें।
मैंद सोईरीक काढिती। फांसे घालून प्राण घेती।
तैसें आयुष्य गेलियां अंती। प्राणीयांस होये।
प्रीती कामिनीसीं लागली। जरी तयेसी कोणी रागजेली।
तरी परम क्षिती वाटली। मानसीं गुप्तरूपें।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView