भक्ती श्रेष्ठ की बुध्दी?

Date: 
रवि, 4 ऑगस्ट 2013

सदा सर्वदा सज्जनांचि योगें।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे।
क्रियेवीण वाचाळता ते निवारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी।।108।।
गेल्या श्र्लोकात आपण म्हटले आहे की बाह्य वातावरणामुळे मेंदूत बदल होतो. बाहेरचे वातावरण जेव्हा चांगले संस्कार घडवील, तेव्हा त्यातून चंागले संस्कारशील मन तयार होईल. आगीचा उपयोग दुसऱ्याच्या घराला आग लावण्यासाठी कित्येकदा केला जातो, त्याप्रमाणेच स्वयंपाक करण्यासाठी होतो. ब्रेन वॉशिंग तंत्राचे तसेच आहे. बाहेरचे वातावरण बदलून वाईट परिणाम घडवून आणता येतो; तसा तो चांगला परिणामही घडवून आणता येतो. परिणाम चांगला घडावा असे वाटत असेल तर सज्जनांच्या संगतीत राहावे, असे या श्र्लोकात सांगितले आहे. मात्र सज्जनांचे नुसते शब्द ऐकण्याऐवजी काही सत्कृतीही केली पाहिजे, असे तिसरी ओळ सांगते.
यापेक्षा सुध्दा चौथी ओळ एका अपूर्व प्रक्रियेकडे घेऊन जाते.शब्द असोत, किंवा क्रिया असोत, ही दोन्ही साधने वापरताना आपण बुध्दिनिष्ठ चर्चा करावयास हरकत नाही, असे चौथी ओळ सांगते. वर दुसऱ्या ओळीत भक्तीभावे उत्पन्न होण्याची गोष्ट आहे. पुष्कळांचा असा गैरसमज आहे की, बुध्दी गहाण टाकली की भक्तीचे श्रेय मिळते. खरी गोष्ट अशी आहे की बुध्दीचा उपयोग करून, ज्ञान मिळवून, त्या ज्ञानाच्या शिखराशी बुध्दी नम्र करणे, त्या ज्ञानाच्या शिखराशी एकरूप होणे, ही भक्ती आहे. ज्ञान मिळवताना काही प्रश्र्न उपस्थित झाले तर, ज्ञान संवाद करण्यास काहीच हरकत नाही, असे चोख सांगणारी ही ओळ आहे. या संदर्भात मार्क्सवादातील एका मजेदार मतभेदाचा उल्लेख पुढल्या श्र्लोकाच्या संदर्भात होईल.

मनोबोधाचे ओवीरूप
स्त्रीकारणें लोलंगता। स्त्रीकारणे अतिनम्रता।
स्त्रीकारणें पराधेनता।अंगिकारिली।
स्त्रीकारणें अंतरला। स्त्रीकारणें धर्म सांडिला।
स्त्रीकारणें सर्वथा कांही। शुभाशुभ विचारलें नाही।
तनु मनु धनु सर्वहि। अन्यनभावें अर्पिलें।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView