भगवान शेषशायीची कथा

Date: 
रवि, 7 सप्टें 2014

देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्र्चित ठेला।
हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी।।165।।

गेल्या श्र्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवान शेषशायीची कथा येथे या श्र्लोकातही चपखल बसते. या श्र्लोकात श्रीरामदास सांगत आहेत की, देह आणि त्यापासून निर्माण होणारा सारा प्रपंच, याची चिंता करीत गेले तर त्यांच्या मुळाशी लोभाचे अधिष्ठान ठेेवलेले आहे असे निश्र्चित समजावे. यावर उपाय तिसरी ओळ सांगते आणि म्हणते की हरीचे चितन केले म्हणजे प्रपंचाच्या व्याधीतन मुक्तीदायी कांता जवळ येईल.
शेषशायीची कथा पहा. त्याने नेमके हे केले आहे. आदिपर्वाच्या सत्तेचाळिसाव्या अध्यायात ही कथा आहे. गरूडाचा द्वेष साप कुळातले बहुतेक प्राणी करीत. शेष मात्रआपल्या प्रपंचातील नातेवाईकांचा तिरस्कार करी आणि गरुडाबद्दल प्रेम बाळगी. अखेर तर त्याने खाणे पिणे सोडून दिले. देहकष्ट घेतले. बद्रिकेदारला गेला. जितेंद्रिय झाला आणि त्यामुळे तो अस्थिपंजर होऊन गेला. म्हणजे श्रीरामदासांनी गेल्या आणि या श्र्लोकात सुचविलेल्या सर्व गोष्टी त्याने केल्या. एवढे प्रचंड पुण केल्यावर खुद्द ब्रह्मदेव शेषापाशी येऊन दाखल झाला. ब्रह्मदेवाने शेषाचे दु:ख विचारले. शेषाने सांगितले की, “नागकुळात माझे नातेवाईक असले तरी माझ्या कुळातल्या इतरांचा माझा संबंध नसावा. तो पुढील जन्मीही नसावा. त्यासाठी मी माझ्या देहाचासुध्दा लोभ सोडतो. “
ब्रह्मदेव हे ऐकून चकित झाला. शेष पुढे म्हणाला, “हे ब्रह्मदेवा, ज्ञान आणि तप यात माझी बुध्दी राहो एवढाच वर दे. “ ब्रह्मदेव म्हणाला, “तुला तपच करावयाचे असेल तर लोकसेवेचे कर. ही पृथ्वी डळमळू लागली आहे. तिला डोक्यावर घेऊन उभा रहा. “

ज्ञानेश्र्वरी मानस
(‘चिंतामुक्ती मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 12 ची मंत्रंसलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तैसे ज्ञानजात तयंा। आणि जे कांही आचरलें गा धनंजया।
तें आघवेचि गेले वाया। जे चित्तहीन।।178।।
अर्थ: अर्जुना, त्यांचा सर्व ज्ञानसंग्रह आणि कर्मसंग्रह, हे दोन्ही वायाच होत; कारण त्यांच्या चित्तात यथार्थ ज्ञानाचा अभाव आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView