भाषची आठवण अवघड

Date: 
रवि, 15 जुलै 2012

भाषची आठवण अवघड
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।53।।

लाळघोटेपणा चांगला असा पहिल्या ओळीतील ‘आर्जवी’ या शब्दाचा अर्थ नाही. दासबोधाच्या दुसऱ्या दशकात सातव्या समासात 7वा श्लोक सांगतो -‘जनी आर्जव तोडू नये।’ तेथेच चौसष्टावा श्लोक ‘सकळ जानासी आर्जव’ असा उल्लेख करीत आहेत. अर्थात् येथे आर्जवाचा अर्थ समोरच्या माणसाचे मन गोडीने वळवून घेण्याचा गुण असा घ्यायला हवा. एखाद्याचा धक्का लागला तर ‘काय दिसत नाही का? ‘ हे कोणी विचारतो, पण हेच शब्द मृदूपणाने ‘चुकून माझा धक्काला लागला तर, त्या निमित्ताने ओळख झाली’असे उच्चारून प्रसंग साखरेचा करता येईल. आणि असे बोलणे सर्वांना प्रिय होणार म्हणून श्लोकाची दुसरी ओळ सांगते की, अशा बोलण्यात सत्य आणि विवेक सोडण्यचा प्रश्र्न उद्भवत नाही. तिसरी ओळ

पुन्हा सांगते की, असा मनुष्य खोटेही बोलत नाही. खोटे बोलणाऱ्याला एक मोठी पंचाईत असते. समोरच्या माणसाला मागल्या वेळेस काय थाप मारली, हे ध्यानात ठेवण्याची जिकीर त्याच्यामागे लागते. खरे बोलणाऱ्याच्या मनावर हा ताण नाही. दोनदाच काय, पण त्रिवाचा म्हणजे तीनदा बोलण्याचा प्रसंग आला तरी तो पहिल्या वेळेप्रमाणेच खरे सांगणार. आणि सहाजिकच तो सत्यप्रिय रामाला प्रिय होणार.

मानस ज्ञानेश्वर
(‘मृत्यु शोक मुक्ती’मंत्र या साधनेसाठी, अध्याय8श्लो.8ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
तेवी सदभ्यासे निरंतर। चित्तासि परमपुरूषाची मोहर।
लावी मग शरीर। राहो अथवा जावो।।82।।
अर्थ: त्याप्रमाणे कर्मयोगाच्या अभ्यासाने चित्ताला परब्रह्माच्या वाटेला लवा. मग मन आणि शरीर राहो अथवा जावो, त्याची काहीच क्षिती नाही.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView