भूमिगत झालेला देव

Date: 
रवि, 14 डिसें 2014

तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले।
तया देवरायासि कोण्ही न बोले।
जगी थोरला देव तो चोरलासे।

देवाचे रूप शोधण्याचे काम श्रीरामदासांनी एकशे चौऱ्याहत्तराव्या श्र्लोकापासून हातात घेतले. त्याची प्राथमिक पूर्तता या श्र्लोकामध्ये होत आहे. एकशे पंचाहत्तराव्या श्र्लोकातील तक्रार श्रीरामदास येथे करीत आहेत. हे तिन्ही लोक निर्माण झाले आहेत, हे आमच्या लक्षात आले आणि ते या श्र्लोकातल्या पहिल्या ओळीतही श्रीरामदासंानी नमूद केले. पण हे सर्व निर्माण कोणी केले? एकशे पंचाहत्तरावा श्र्लोक देवाचे नाव सांगतो. पण तेथे दुसऱ्या ओळीत विचारला आहे. याचा निष्कर्ष त्यंानी तिसऱ्या ओळीत काढला आहे आणि म्हटले आहे. “श्रेष्ठ असा देव चोरलासे” म्हणजे गुप्त झाला आहे असे वाटते.

एकशे एकाहत्तराव्या श्र्लोकात पहिल्या ओळीमध्ये बरोबर हीच शंका निर्माण झाली होती. तेथे आपण जो शोध घेतला तोच येथे उपयोगी पडेल की, देव गुप्त झालेला नसून आपल्या अहंकारामुळे तो आपल्याला दिसत नाही. तो दिसण्याची, म्हणजे असे येथील चौथी ओळ सुचविते. म्हणजे आपला संकुल शोध आता गुरूकडे वळला. मनाचे पुढले चार श्र्लोक गुरूचे चांगले वाईट भेद सांगत आहेत.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘परलोकसंपर्क मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9 श्र्लोक 15ची मंत्रसंलग्न ओवी लेखकच्या निवदेनातील तळटीपेप्रमाणे.)
एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें। तरी कवणी के उपासिला नोहें।
एथ एके जाणणेवीण ठाये। अप्राप्तासी।।262।।
अर्थ: मीच सर्वत्र एकमेवाद्वितीय आहे, तर मग माझी उपासना कोणाला आणि केव्हा घडणार नाही बरे? अर्थात् सर्वांनाच ती निरंतर घडली पाहिजे. मात्र माझे हे सर्वव्यापक ज्ञान न झाल्याने जीव अप्राप्त स्थितीत असतात. म्हणजे ते माझ्या यथार्थ स्वरूपाला प्राप्त होत नाहीत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView