मत्सराचा घोटाळा

Date: 
रवि, 27 जाने 2013

मना मत्सरे नाम सांडू नको हो।
अती आदरें हा निजध्यास राहो।
समस्तांमध्ये नाम हें सार आहे।
दुजी तूळणा तूळितां ही न साहे।।81।।

मत्सराबद्दलची मजेदार चर्चा गेल्या श्लोकाच्या शेवटी आपण केली. या श्लोकाची पहिली ओळही पुन्हा मत्सराबद्दल बंडच करून उठली आहे. नाम घेताना, म्हणजे रामाचे स्मरण करताना “मत्सर करू नये” असा अर्थ काही भाष्यकरांनी केला आहे. पण तो तितकासा ठीक वाटत नाही.
साधुसंतांच्या उपदेशामुळेच गोडी लागायची; मग त्यांचाच मत्सर कोणाला कशाला वाटेल? तेव्हा रामाच्या नावाचा उच्चार करताना “मत्सर करू नये” , हे श्रीरामदासांनी बहुधा वैष्णव आणि शैव यांतील मत्सराला उद्देशून सांगितले असले पाहिजे. याचा स्पष्ट पुरावा असा की, या श्लोकानंतरच्या ब्याऐंशी, त्र्याऐंशी, चौत्र्याऐंशी व पंच्याऐंशी या चारी श्लोकात श्रीशंकराच्या रामभक्तीचा उल्लेख आला आहे. याचा अर्थ असा की, शिवभक्तानीसुध्दा मत्सराने रामाचे नाव बाजूला टाकू नये.

खरी गोष्ट अशी की, पूर्वी अनेक श्लोकांत म्हटल्याप्रमाणे श्रीरामदासांना निरनिराळ्या परमशक्तीची एकता अभिप्रेत आहे. तसेच अगदी पहिल्या श्लोकापासून रामाचे निर्गणस्वरूप श्रीरामदासांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून मत्सर हा शब्द मुळात श्रीरामदासांकडे नाही. तसाच तो शिवभक्तांकडेही नसावा, ही त्यांची मागणी सरळ आहे. त्या दृष्टीने दुसऱ्या ओळीतील निजध्यास हा शब्दसुध्द महत्त्वाचा आहे. निजध्यास याचा अर्थ स्वत:चे, स्वत:च्या आत्म्याचे चिंतन सूचित आहे. निराकार चिंतन सामान्याला शक्य नाही, म्हणूनच तिसऱ्या ओळीत नामाचे सार सांगितले आहे आणि चौथ्या ओळीत अशा रामानामाच्या सामर्थ्याला तुलना नाही, असे सांगावयाचे आहे.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘उद्योगसिध्दि’मंत्र या साधनेसाठी अध्याय 8 श्लेा.14ची मंत्रसंलग्न ओवी, लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे)
तिहे जे वेळी मी स्मरावा। ते वेळी स्मरला की पावावा।
तो आभारूही जीवा। साहवेचि ना ।।130।।
अर्थ: ज्यावेळी माझे स्मरण करतील, त्याच वेळी मी धाव ठोकून त्यांच्याजवळ सिध्द झाले पाहिजे; त्यांच्या त्या एकनिष्ठ उपासनेचा भार एऱ्हवी मला सहनच व्हावयाचा नाही!

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView