मनदु:खाचे चार प्रकार व उपाय

Date: 
रवि, 5 जाने 2014

मनदु:खाचे चार प्रकार व उपाय
मना अल्प संकल्प तो ही नसावा।
मना सत्य संकल्प चित्ती वसावा।
जनी जल्प वीकल्प तो ही तजावा।
रमाकांत येकांतकाळी भजावा।।130।।

मागल्या वेळेल गतीनियमांचा उल्लेख केला. श्रीसमर्थांनी गतीप्रतिगतीच्या नियमाने सुखातून दु:ख कसे येते हे सांगितले आणि मनाला शांत राहण्याची युक्त सांगितलील. चलबिचल हा शरीराचा धर्म आहे. ती हालचाल सज्जनांचे संगतीने केली म्हणजे
तिच्यातून वाईट परिणाम होणार नाहीत, हे सूत्र श्रीरामदास सांगत आहेत.
त्या सूत्राचा खुलासा या श्र्लोकात करताना ते म्हणतात की, मनाच्यां छोट्या छोट्या इच्छा म्हणजे संकल्पही टाळावेत. कारण प्रथम म्हटल्याप्रमाणे मनाच्या इच्छा या सुखाच्या इच्छा धरणाऱ्या असतात. मोठ्या इच्छा टाळण्याची सवय आयुष्यात सहजतेने येण्याआधी छोट्या इच्छा टाळण्याची सवय व्हायला हवी. श्रीरामदास तसे पहिल्या ओळीत सुचवतात; पण चांगला संक्ल्प धरावा हे मात्र ठसठसून दुसऱ्या ओळीत सांगतात. तेच ते तिसऱ्या ओळीत स्पष्ट करतात. म्हणजे पहिली ओळ मुळात एक अर्थी आहे. दुसऱ्या ओळीत सत्संकल्प सांगितलेला आहे; तो संकल्प म्हणजे नुसता उच्चार नव्हे, तर कृतीही आहे. सारांश सुखाच्या येणाऱ्या इच्छेमुळे जे घोर परिणाम घडतात त्यावर काहीतरी चांगले कारण हा उत्कृष्ट उपाय श्रीरामदासांनी येथे मांडला आहे.
म्हणजे’सत्’ हा उपाय मनाच्या व्याधीवर हमखास झाला. आता मनाच्या भय, राग, धैर्य व शांती या भावना बऱ्यावाईट संकल्पातून येतात, त्याचा विस्तार पुढील चार श्र्लोक करतात. नंतर विस्ताराचे विवेचन विविध अंगाने, पुराव्यासह श्रीरामदास एकशे चव्वेचाळीसाव्या श्र्लोकापर्यंत करतात. आणि तेथे मन:शक्तीचा आलेख भरण्याची युक्ती निष्कर्षाने मिळते.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘भूतशांती’मंत्र, या साधनेसाठी अध्याय 8, श्र्लोक 28ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
मग तया सुखाची किरीटी। करुनियां गा पाउटी।
परब्रह्मचियें पाटी। आरुढती।।267।।
अर्थ: हे स्वर्गसुख मातीमोलाचे ठरवून ते योगी त्याला आपल्या पायाखाली पायरीसारखे घालतात, आणि या पायरीवर उंचावून ते परब्रह्माचे पीठावर चढतात.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView