मनशुध्दी- तीन पायऱ्या

Date: 
रवि, 31 ऑगस्ट 2014

मनें कल्पिाला वीषयो सोडवावा।
मनें देव निर्गूण तो वोळखावा।
मनें कल्पिात कल्पना ते सरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी।।164।।

एकशे अठ्ठवान्नाव्या श्र्लोकाच्या शेवटी आपण म्हटले आहे की, त्या श्र्लोकातील शेषनागाच्या उल्लेखाचे अधिक महारूप आपल्याला एकशे चौसष्ठाव्या श्र्लोकानंतर मिळेल. याच पुढल्या दोन श्र्लोकांमध्ये त्या भगवान शेषशायी नागाची हकिगत कशी लागू पडते, हे आपण पाहू या.

या श्र्लोकाची मुख्य धारणा म्हणजे मनाची प्रगती करून घेणाऱ्या तीन पायऱ्या आहेत. पहिली पायरी अशी की, मनात जो विषय उभारलेला असेल तोच प्रथम सोडून द्यावा. दुसरी पायरी अशी की, अशा निर्विषय मनाने निर्गण देवाची ओळख करून घ्यावी. अर्थात् ही ओळख मनाच्या सत् संकल्पनेनेच होईल. त्यातून ही तिसरी पायरी निघेल. म्हणजे ही कल्पना करता करता कल्पनाच संपून जाईल. एकशे अठ्ठावन्नाव्या श्र्लोकात शेवटी मनाने सर्व ज्ञान सोडून निरहंकार होऊन,नागाप्रमाणे स्थिर रहावयास सांगितले आहे.

तेथे म्हटल्याप्रमाणे भगवान शेषशायी नाग, हजारमुखी असूनसुध्दा मौन राहिला आहे. म्हणजे त्याची कृती बोलकी आहे. दुसऱ्याचे सत् करण्यासाठी, सर्व जगाला स्थिर करण्यासाठी भगवान शेषशायी नागाने पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर घेतला आहे. म्हणजे नुसत्या शब्दाच्या बुडबुड्यामागे न लागता, समाजहिताचे साकार मौन भगवान शेषशायीने पत्करलेले आहे. तेसुध्दा या श्र्लोकात सांगितलेल्या तिन्ही अटी पाळून. त्याचा धागा आपल्याला पुढल्या श्र्लोकात मिळेल.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘चिंतामुक्ती मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 11 ची मंत्रंसलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
किंबहुना भवा बिहाया। आणि साचें चाड आथी जरी मिथां।
तरि तूं गा उपपत्ती इया। जतन कीजे।।140।।
अर्थ: संसाराची भीती वाटत असेल आणि माझ्याविषयीची खरी आवड असेल, तर हा तत्वविचार तू काळजीपूर्वक स्मरणात ठेवला पाहिजेस.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView