मनाच्या आलेखाचे मोठेपण

Date: 
रवि, 20 एप्रिल 2014

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मासि आला।
विवेकें सदा स्वस्वरूपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे।।145।।

गेल्या श्र्लोकात मनाच्या शक्तीचा आलेख भय, राग, धैर्य, शंाति यांच्या संदर्भात कसा तयार करावयाचा हे आपण पाहिले. आदला दिवस आपण घालवल याचे आत्मचिंतन करून, ज्या तऱ्हेने तो घालविला असेल, त्या तऱ्हेचे टिंब मोठे करावे असे सुचविले.

एक नुसते टिंब मोठे करावयाचे ही सोपी आणि वरवरची गोष्ट वाटते. परंतु समजा आदला दिवस तुम्ही धैर्याने घलविला, असा निर्णय स्वत:बद्दल दिला. कशावरून धैर्याचे श्रेय आपण घेतो याचा जाब माणसाला आपल्याबद्दल द्यावाच लागेल. आपण काही खोटे काम केले असेल, वैषयिक विचार अधिक बाळगले असतील, किंवा कोणावर रागावलेले असू, तर हे आठवावे लागेल. आणि त्यापेक्षा धैर्याची परीक्षा कालच्या दिवसात अधिक दिली असेल तरच त्याचे श्रेय आपणाला घेता येईल. म्हणजे आदल्या दिवसात चूक केल्याची कबुली दिली नाही, तरी त्याचे चिंतन करावे लागेल. योग्य वागल्याचे श्रेय घेतले तरी संकुल चिंतन अटख आहे.

ही प्रक्रिया श्रीरामदासांनी या श्र्लोकात स्पष्ट करताना म्हटले आहे, ‘जीव हा विषयाचे चिंतन नेहमी करतो. तो अज्ञान आणि अहंकाराने जन्माला आलेला आहे. यावर उपाय म्हणजे विवेकाने आत्मचिंतन करावे. ‘ते आत्मचिंतन कसे करावे, याची सोपी रीतच आपला आलेख सांगत आहे. आत्मचिंतन आले म्हणजे मरणच आपण होऊन मरेल, असे होऊन जाईल.

मानस ज्ञानेश्र्वर
(‘पुनर्मीलन मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 4ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
का बीजचि जाहलें तरु। अथवा भांगारचि अळंकारु।
तैसा मज एकाचा विस्तारु। तें हें जग।।65।।
अर्थ: बीजच तरुरूपाने प्रकट होते किंवा सुवर्णच अलंकाराचे रूप बनते, त्याप्रमाणे माझ्या एकाचाच विस्तार म्हणजे हे जग होय.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView