मन ओळखल्याचा सोपा आलेख

Date: 
रवि, 13 एप्रिल 2014

जगी पाहतां साच तें काय आहे।
अती आदरे सत्य शोधूनि पाहें।
पुढें पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रमे भ्रंाति अज्ञान हे सर्व मोडें।।144।।

एकशेएकोणतिसाव्या श्र्लोकापासून जे विज्ञान श्रीरामदास सांगत आहेत, त्या विज्ञानाच्या संदर्भात सत्य शोधून पाहण्याचे आवाहन हा श्र्लोक करतो. मनाच्या चार पातळ्या आपण 126व्या श्र्लोकात पाहिल्या. आणि त्या पातळ्या म्हणजे भय, राग, धैर्य, शांती! अर्थात् या चार पातळ्यांचा अनेक उपप्रकार होऊ शकतील. त्याप्रमाणे खुद्द या चार पातळ्या एकमेकांत मिसळू शकतील. परंतु तारतम्याने प्रत्येक व्यक्ती एवढे खात्रीने शोधून काढू शकेल की तिुया आतल्या गरजा खऱ्याखुऱ्या आहेत. या गरजांचा आलेख मांडणे सोपे आहे.
एका कागदावर डाव्या हाताला या चार प्रवृत्ती मांडाव्यात. कागदाच्या डोक्यावर महिन्याचे 30 अगर 31 दिवस दाखविणारे अंक ठेवावेत. प्रत्येक तारखेखाली आणि या चार प्रवृत्तींच्या समोर एकेक टिंब ठेवावे. रोज सकाळी 8च्या सुमाराला चिंतन करावे, की आदल्या दिवशी या चार पैकी कोणत्या प्रवृत्तीत आपला दिवस गेला. ज्या प्रवृत्तीत आपला कालचा दिवस गेला असेल, त्या प्रवृत्तीसमोरचे टिंब भरीव करावे. याबद्दल स्पष्ट निर्णय न करता आला तर स्वप्नातील अनुभव; या चार प्रवृत्तींपैकी जो येईल, त्याप्रमाणे टिंब भरावे. परंतु हे स्वप्नटिंब पोकळ ठेवावे.

या पध्दतीने महिन्याच्या अखेर ही टिंबे एकमेकांस रेषेने जोडली की प्रत्येकाच्या आतल्या गरजेचा एक स्वयंसिध्द आलेख तयार होईल. त्याने आत्मशोधन, आत्मचिंतन व आत्मशुध्दीही सोपी होईल. मानचित्र लेखकाचे निवेन पान साठवर.
संसारातील अनेक व्याधी-उपाधी यामुळे टळतात. एकदा या आलेखाची सवय झाली म्हणजे जन्मजन्माचे सत्य हाती येईल. अज्ञान जाईल आणि देव हाती येईल.
श्र्लोकाच्या पहिल्या दोन ओळी सत्यशोधन सांगत आहेत. शेवटल्या दोन ओळी असे सांगतात, की मनाबद्दलचे सत्य तुम्हाला सापडले, म्हणजे तुम्हाला देवदर्शन होईल, कारण ते आत्मशुध्द माणसाला होतेच.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView