मरणभीती टाळण्याचा उपाय

Date: 
रवि, 26 फेब्रु 2012

मरणभीती टाळण्याचा उपाय
ऊसे मेरूमांादार हे सृष्टिलीळा।
शशी सूर्य तारांगणें मेघमाळा।
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।33।।
मानसशास्त्रामध्ये मनाला धीर देण्याचा विभाग महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टींची मन शंका घेते, त्या शंकेचे निराकरण, निरनिराळी उदाहरणे देऊन करता येते. याप्रमाणे मनातल्या शंका दूर झाल्या, की धीर येतो आणि असा धी आला म्हणजे फायदा होतो, स्वत:ची शक्ती वाढते, आत्मविश्र्वास वाढतो. हा एक फायदा झाला. शिवाय ज्याच्याबद्दल ही उदाहरणे दिली जातात, ज्याच्यामुळे धीर येतो, त्या व्यक्तीबद्दलही धीर वाढत जातो. म्हणून चालू कार्यासाठी धीर मिळतो. तसाच धीराचा साठाही होऊ शकतो असा दुहेरी फायदा थोरांच्या धीरस्मरणाने होतो.
अठ्ठाविसाव्या श्लोकापासून राम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही. याची उदाहरणे दिली जात आहेत. तेहतिसाव्या श्लोकात ठामपणाने सांगितले आहे की, जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत, तोपर्यंत रामाच्या भक्तांना कसलेही भय नाही. आता या श्लोकात प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मारूती आणि बिभीषण या भक्तांचे दिले आहे.
रामाच्या भक्तांपैकी चिरंजीय झालेले, मरण नसलेले दोन भक्त, म्हणजे मारूती आणि बिभीषण. बिभीषणाने रावणासमोर रामाची बाजू घेऊन जीव धोक्यात घातला होता आणि मारूतीने तर पावलपावलाला, झेपेझेपेला जीव झोकून दिला होता. रामासाठी मरणाचीही पर्वा न करणाऱ्यांना अमरत्वापेक्षा मोठे बक्षिस कोणते मिळेल? तेच रामाने दिल्याचे उदाहरण या श्लोकात पुढे ठेवले आहे. मरण आणि मरणभीती ही मानसविज्ञानाच्या दृष्टीने एक आहे. तेव्हा सामान्य माणसाने मरणापेक्षा, मरणभीतीतून रामनिष्ठेने सुटण्याची जिद्द धरावी. अध्यात्म रामायणातील युध्दकांड, सर्ग 3.43मध्ये सूर्य चंद्र असेपर्यंत रामगुण गाजत राहण्याचा उल्लेख आहे. तो या श्लोकातील रामदासांच्या आत्मविश्वासाशी जुळता होतो.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘आप्तवियोग शंाती मंत्र’या साधनेसाठक्ष अ.7 श्लो.30ची मंत्रसंलग्न ओवी -लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे)
जया जाणिवेचेनि वेगे। मी अधियज्ञुही दृष्टी रिगे।
ते तनूवेनि वियोगे। विऱ्हये नव्हती।।181।।
अर्थ: ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या बळाने माझे अधियज्ञ म्हणजे परब्रह्म स्वरूप दिसू लागले आहे, ते या देहाचा पात झाला असता दु:खी होत नाहीत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView