मारणारा बाप व ताप

Date: 
रवि, 2 ऑक्टो 2011

मारणारा बाप व ताप
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे।।
विवेके देहेबुध्दि सोडून द्यावी।
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी।।12।।
रामदास उपदेश करीत आहेत की, हे मना, तू दु:ख मनातच आणू नकोस. यावर कोणी विचारील की, दु:ख मनात आणू नकोस म्हणजे काय? मनात काय एखादी भावना झाकून ठेवण्यासाठी एखादी निराळी जागा का असते? असते तर! तुम्हीच विचार करून पाहा. बाप ज्यावेळी मुलाला रागाने मारत असतो, त्या क्षणाला मुलावरची माया बापाच्या मनातून कोठे गेलेली असते? रागाचा झटका आलेला असताना ते प्रेम वर कसे येत नाही? त्या मारामुळे मुलगा घरातून पळून गेल्यावर मग बाप जाहिरात कशाला देत बसतो, की मी रागावले हे चुकले. लौकर परत ये. म्हणूनच रामदास म्हणत आहेत की, दु:खाचे चिंतन करणे हे मनाच्या हाती आहे. विवेक धरावा, सतत शरीराचे लाड करत बसू नये. त्यातच गुंतून बसू नये. या देहाच्या वासनांपासून अलिप्त राहण्याची सवय करणे, म्हणजे मुक्ती. ती भोगावी ही चौथ्या ओळीतली सांगी.
मनाचे अभंग रूप
घेसी तरी येइ संतांची हे भेटी। आणीक ते गोष्टी नको मना।।1।। ।।धृ।।
सर्वभावें त्यांचे देव भांडवल। आणीक ते बोल न बोलती।।2।।
करिसील तो करी संतांचा सांगात। आणीक ते मात नको मना।।3।।
बैससी तरी बैस संतां च मधी। आणीक ते बुध्दि नको मना।।4।।
जासी तरि जाई संतांचिया गावां। होईल विसावा तेथे मना।।5।।
तुका म्हणे संत सुखाचे सागर। मना निरंतर धणी घेई।।6।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView